Guru Purnima 2024: पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार जून-जुलै महिन्यात (हिंदू आषाढ महिना) पौर्णिमेला गुरु पौर्णिमा हा सण येतो, ज्याला पौर्णिमेचा दिवस म्हणूनही ओळखले जाते. ज्ञान, शहाणपण आणि मार्गदर्शन प्रदान करून एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या शैक्षणिक किंवा आध्यात्मिक शिक्षक आणि गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा मुख्यतः एखाद्याच्या जीवनातील गुरु किंवा शिक्षकांना धन्यवाद देण्याचा दिवस आहे. अंधार (अज्ञान) दूर करणारे आणि आपल्या शिष्यांना ज्ञानाकडे नेणारे म्हणून गुरु कडे बघितले जाते. आजच्या या खास दिनी तुम्ही आपल्या गुरुजनांना छान संदेश पाठवून (Happy Guru Purnima 2024 Wishes, WhatsApp Status, Images, Quotes, Messages & Greetings) शुभेच्छा देऊ शकता.
पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
> ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान,
जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा,
देव तेथेची जाणावा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
> आयुष्यातला पहिला गुरू म्हणजे आई
जिने प्रत्येकावर संस्कार केले आणि
त्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल घडवलं
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
> गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुंना खूप खूप शुभेच्छा!!
> कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता
माझ्या बाजूला
तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा
आई- बाबा तुम्हाला गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
> तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,
एखाद्याचे चरित्र बदलते,
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत
रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
> ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या गोष्टीतून
ज्यांनी केला आपल्या शिष्यावर खोलवर परिणाम
ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली
अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)