Hartalika 2025 Date Time : सुखी वैवाहिक जीवनासाठी अशा पद्धतीने करा हरतालिकेचे व्रत; जाणून घ्या पूजा विधी आणि यंदाचा शुभ मुहूर्त

भाद्रपद शुद्ध तृतीयेला स्त्रिया स्वर्णगौरीसह हरितालिका व्रत करतात. यंदाच्या हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त...
Hartalika 2025 Date Time : सुखी वैवाहिक जीवनासाठी अशा पद्धतीने करा हरतालिकेचे व्रत; जाणून घ्या पूजा विधी आणि यंदाचा शुभ मुहूर्त
Published on

चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होताच, उत्सवांचा नवा सोहळा घेऊन भाद्रपद महिना सुरू झाला आहे. या महिन्यात अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण जगभर जिथे जिथे गणेशोत्सव साजरा केला जातो, तिथे भक्तिभाव आणि चैतन्याची लहर दिसते. पण बाप्पाच्या स्वागतापूर्वी येते ते हरितालिका तृतीयेचे मंगल व्रत. भाद्रपद शुद्ध तृतीयेला स्त्रिया स्वर्णगौरीसह हरितालिका व्रत करतात. यंदा हरितालिका तृतीया कधी आहे, तिचा शुभ मुहूर्त, आणि पूजा विधी, याची माहिती जाणून घेऊया...

यंदा हरितालिका तृतीया कधी आहे?

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी यंदा सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होईल. भारतीय पंचांग पद्धतीनुसार उदयतिथीला प्राधान्य दिले जाते, त्यामुळे हरितालिका तृतीया व्रत हे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरे करण्यात येईल.

हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त

यंदाच्या हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त मंगळवारी पहाटे ५ वाजून ५६ मिनिटांपासून सुरू होऊन सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. दोन तास ३५ मिनिटांचा हा कालावधी पूजेसाठी अत्यंत मंगल मानला जातो. या वेळेत महिलांनी गौरी-शंकराची स्थापना करून हरितालिकेचे व्रत करणे श्रेयस्कर मानले गेले आहे.

हरतालिकेची पूजा कशी करावी?

हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची तसेच शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी. या पूजेनंतर हरितालिका कथेचे पठण केले जाते. पूजेच्या वेळी “गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये।।” या मंत्राचा जप केल्यास विशेष पुण्य लाभते, असे मानले जाते.

logo
marathi.freepressjournal.in