रिकाम्या पोटी चिकू : लठ्ठपणावर ब्रेक, कर्करोगाचा धोका कमी, जाणून घ्या फायदे

रिकाम्या पोटी चिकू : लठ्ठपणावर ब्रेक, कर्करोगाचा धोका कमी, जाणून घ्या फायदे
Published on

आपल्या दैनंदिन आहारात लहानसं पण पौष्टिक फळ मोठी जादू करू शकतं. अशाच फळांपैकी एक म्हणजे चिकू. रोज सकाळी रिकाम्या पोटी हे गोडसर फळ खाल्ल्यास शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. फक्त चवीपुरतंच नाही तर पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे ते मेंदू, हाडं, रोगप्रतिकारक शक्ती, रक्तदाब यांसारख्या गोष्टींसाठीही वरदान मानलं जातं.

पचनसंस्था होईल मजबूत

चिकूमध्ये नैसर्गिक फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर रेचक म्हणून कार्य करतं, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. नियमित सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट हलकं वाटतं.

हाडं होतील बळकट

कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजांनी समृद्ध असल्यामुळे चिकू हाडं मजबूत ठेवण्यात मदत करतं. वाढत्या वयात मुलांच्या हाडांच्या विकासासाठीही सकाळी हे फळ खाणं फायदेशीर ठरतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे चिकू शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून शरीराचं नैसर्गिक संरक्षण होतं.

वजन कमी करण्यास मदत

सकाळी रिकाम्या पोटी दोन-तीन चिकू खाल्ल्याने चयापचय (Metabolism) वाढतो. फायबरयुक्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते.

रक्तदाब राहतो नियंत्रणात

पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या उपस्थितीमुळे चिकू रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी हे फळ नैसर्गिक टॉनिकच ठरतं.

कर्करोगाचा धोका कमी

चिकूमध्ये आढळणारे कर्करोगविरोधी घटक शरीरातील पेशींना सुरक्षित ठेवतात. विशेषतः स्तनाच्या कर्करोगावरील अभ्यासात याचे फायदे अधोरेखित झाले आहेत.

गरोदरपणातही उपयुक्त

जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे यांनी भरपूर असलेला सपोटा गर्भाशयातील बाळाच्या वाढीस सहाय्यक ठरतो. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी हे फळ खाणं अधिक उपयुक्त मानलं जातं.

थोडक्यात, सकाळची सुरुवात चिकूपासून केल्यास शरीराला एकाचवेळी पोषण, ऊर्जा आणि आजारांविरोधात नैसर्गिक संरक्षण मिळतं. म्हणूनच, या गोडसर फळाला ‘चमत्कारिक फळ’ म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in