

चॉकलेट म्हटलं की मुलांच्या डोळ्यात लगेच चमक येते. पण बाजारात मिळणाऱ्या चॉकलेटमध्ये साखर, कृत्रिम फ्लेवर, प्रिझर्वेटिव्ह आणि तेलकट घटक असतात. हे सगळं मुलांच्या दातांसाठी, त्वचेसाठी आणि पचनासाठी चांगलं नसतं. त्यामुळे पालक नेहमी मुलांना चॉकलेट देणं टाळतात. तरीही मुलांचा वारंवारचा हट्ट पाहून पालकांचा मनात प्रश्न येतो -“मुलांना चॉकलेट द्यायचं का?”
उत्तर सोपं आहे- हो, पण घरचं बनवलेलं!
घरच्या घरी बनवलेल्या चॉकलेटमध्ये तुम्ही साखरेचे प्रमाण ठरवू शकता आणि मुलांच्या आरोग्याची काळजीही घेऊ शकता. अशाच सोप्या आणि खास घरच्या चॉकलेटच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हे चॉकलेट फक्त चविष्टच नाही, तर उर्जेने भरलेलं आहे. बदाम, अक्रोड आणि किशमिशमुळे शरीराला प्रोटीन, फायबर आणि चांगल्या फॅट्सची मिळते भरपूर ताकद.
साहित्य:
१ कप डार्क चॉकलेट (चिप्स किंवा ब्लॉक)
¼ कप कापलेले बदाम व अक्रोड
¼ कप सुकी फळं (किशमिश, क्रॅनबेरी किंवा ड्राय ब्लूबेरी)
चिमूटभर मीठ
कृती:
एका बाउलमध्ये चॉकलेट ठेवा आणि डबल बॉयलरवर (किंवा मायक्रोवेव्हमध्ये) वितळवा.
वितळलेले चॉकलेट बटर पेपर लावलेल्या ट्रेवर पसरवा.
त्यावर सुकामेवा आणि सुकी फळं शिंपडा.
वरून चिमूटभर मीठ टाकल्याने चव अजून उठून दिसते.
हा ट्रे फ्रीजमध्ये १ तास ठेवा.
थंड झाल्यावर लहान तुकडे करा आणि सर्व्ह करा!
हे चॉकलेट फ्रिजमध्ये काही दिवस टिकते. मुलांना डब्यात, प्रवासात किंवा टिफिनसोबत देण्यासाठीही उत्तम पर्याय आहे.
....................................
साहित्य:
1 कप डार्क चॉकलेट
½ कप किसलेला नारळ
1 टेबलस्पून मध (ऐच्छिक)
कृती:
चॉकलेट वितळवा.
त्यात किसलेला नारळ आणि मध मिसळा.
छोटे बॉल्स करून बटर पेपरवर ठेवा.
थंड झाल्यावर मुलांना सर्व्ह करा.
....................................
ही रेसिपी मुलांसाठी सुपरहेल्दी आहे. चिया बीजमध्ये ओमेगा-३, फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. हे पुडिंग गोड, क्रीमी आणि अतिशय हलकं लागतं.
साहित्य:
¼ कप चिया बीज
१ कप बदाम दूध (किंवा नारळाचं दूध)
२ टेबलस्पून कोको पावडर
१ टेबलस्पून मध किंवा खजूर सिरप (ऐच्छिक)
वरून सजावटीसाठी डार्क चॉकलेट किंवा फळांचे तुकडे
कृती:
एका बाउलमध्ये दूध, कोको पावडर आणि मध एकत्र करून नीट फेटा.
त्यात चिया बीज टाकून हलवा.
झाकण ठेऊन ते मिश्रण फ्रीजमध्ये किमान ३-४ तास ठेवा.
ते घट्ट झालं की पुडिंग तयार.
सर्व्ह करताना वरून डार्क चॉकलेटचे काप किंवा केळ्याचे तुकडे टाका.
हे पुडिंग सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या हेल्दी स्नॅकसाठी अगदी योग्य आहे.
....................................
साहित्य:
1 कप डार्क चॉकलेट
¼ कप कापलेले अक्रोड
¼ कप कापलेले बदाम
1 टेबलस्पून किशमिश
कृती:
एका बाउलमध्ये चॉकलेट वितळवा.
त्यात अक्रोड, बदाम आणि किशमिश मिसळा.
त्यानंतर टायर मिश्रण ट्रेवर पसरवा आणि फ्रीजमध्ये घट्ट होऊ द्या.
डार्क चॉकलेट वापरा. त्यात साखर कमी आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात.
मध किंवा खजूर सिरप वापरल्यास गोडवा नैसर्गिक राहतो.
लहान मुलांसाठी दूध थोडं गरम करून त्यात थोडं घरचं चॉकलेट टाकल्यास “हेल्दी हॉट चॉकलेट” तयार होतं!