Health Tips : महागड्या स्किन केअरला विसरा! ‘या’ फ्रूट जेलीमुळे मिळेल नैसर्गिक ग्लो

त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा आहे? मग बीट, गाजर, डाळिंब आणि संत्र्यांपासून घरच्या घरी बनवा हेल्दी फ्रूट जेली. चविष्ट आणि पौष्टिक मराठी रेसिपी.
Health Tips : महागड्या स्किन केअरला विसरा! ‘या’ फ्रूट जेलीमुळे मिळेल नैसर्गिक ग्लो
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्सचा आधार घेतात. मात्र त्वचेची खरी चमक ही बाहेरून नाही, तर शरीराला योग्य पोषण मिळाल्यावर दिसून येते. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक फळांचा समावेश करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं.

बीट, गाजर, डाळिंब आणि संत्र्यासारख्या लाल व रंगीत फळांमध्ये व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. या फळांपासून घरच्या घरी तयार केलेली हेल्दी जेली शरीरासोबत त्वचेलाही फायदेशीर ठरू शकते.

Health Tips : महागड्या स्किन केअरला विसरा! ‘या’ फ्रूट जेलीमुळे मिळेल नैसर्गिक ग्लो
उन्हाळ्यात शरीराला लगेच थंडावा हवा? झटपट तयार करा कोकम मॉकटेल

साहित्य

  • १ बीट

  • १ गाजर

  • डाळिंबाचे दाणे

  • १ संत्रं

  • लिंबाचा रस

  • गूळ

  • अगर-अगर पावडर

कृती

सर्वप्रथम बीट आणि गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढा आणि छोटे तुकडे करा.

संत्र्याचा गर आणि डाळिंबाचे दाणे वेगळे काढून ठेवा.

मिक्सरमध्ये बीट, गाजर, संत्र्याचा गर आणि डाळिंबाचे दाणे घालून बारीक पेस्ट तयार करा. त्यात लिंबाचा रस आणि थोडासा गूळ घालून पुन्हा एकजीव करा.

तयार मिश्रण गाळून त्याचा रस वेगळा काढा.

दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात अगर-अगर पावडर मिसळा आणि पूर्णपणे विरघळू द्या. त्यानंतर त्यात फळांचा रस घालून मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत हलवत राहा.

आता हे मिश्रण मोल्डमध्ये किंवा छोट्या डब्यात ओतून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

Health Tips : महागड्या स्किन केअरला विसरा! ‘या’ फ्रूट जेलीमुळे मिळेल नैसर्गिक ग्लो
पार्लरला जाण्याची गरज नाही! घरच्या घरी करा 'हायड्रा फेशियल'; कमी खर्चात मिळवा नैसर्गिक ग्लो

त्वचेसाठी कशी ठरू शकते फायदेशीर?

या फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. बीट आणि डाळिंबामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळू शकते, तर गाजरामधील घटक त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकवण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

लहान मुलांसाठीही हेल्दी पर्याय

बाजारातील जास्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह असलेल्या जेलीपेक्षा घरच्या घरी तयार केलेली ही फ्रूट जेली अधिक हेल्दी पर्याय ठरू शकते.

चव आणि आरोग्याचा हटके कॉम्बिनेशन

थंडगार आणि चटकदार चवीमुळे ही जेली उन्हाळ्यात खूप रिफ्रेशिंग वाटते. कमी साहित्यांत तयार होणारी ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करून पाहू शकता.

logo
marathi.freepressjournal.in