Healthy lunchbox ideas : आज मुलांना डब्ब्यात काय बरं द्यायचं? 'या' सोप्या रेसिपी तुमच्यासाठी

सकाळची धावपळ आणि मुलांच्या शाळेच्या तयारीत डब्ब्यात काय द्यायचं हा आईसमोर नेहमीचा प्रश्न असतो. अशावेळी झटपट आणि चविष्ट असे काही हेल्दी पदार्थ नक्की करून पाहा...
Healthy lunchbox ideas : आज मुलांना डब्ब्यात काय बरं द्यायचं? 'या' सोप्या रेसिपी तुमच्यासाठी
Published on

सकाळची धावपळ, मुलांची शाळेची तयारी आणि त्यात मुलांना डब्ब्यात काय द्यायचं हा नेहमीच आईसमोर उभा राहणारा प्रश्न. पण मुलांच्या योग्य वाढीसाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी सकाळचा नाश्ता आणि डब्ब्यातील पदार्थ पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे. अशावेळी झटपट बनणारे आणि मुलांना आवडणारे हे काही हेल्दी पर्याय नक्की करून पाहा.

भाज्यांचे पराठे (मुलांसाठी हेल्दी)

साहित्य :

  • गव्हाचं पीठ – २ कप

  • किसलेलं गाजर – ½ कप

  • बारीक चिरलेला पालक – ½ कप

  • उकडलेलं बटाटं – १

  • बारीक चिरलेला कांदा – १ (ऐच्छिक)

  • मीठ, हळद, लाल तिखट, जीरं पावडर – चवीनुसार

  • तूप/तेल – शेकण्यासाठी

कृती :
१. गव्हाच्या पीठात सर्व भाज्या, मसाले आणि उकडलेलं बटाटं एकत्र मिक्स करा.
२. पाणी घालून मऊसर पीठ भिजवा.
३. लाटून पराठे तयार करा.
४. तव्यावर तेल/तूप घालून दोन्ही बाजू छान सोनेरी भाजा.

हा पराठा तुम्ही मुलांना दही किंवा लोणच्यासोबत देऊ शकता.

.......................

फळांची स्मुदी

साहित्य :

  • दूध किंवा दही – १ कप

  • केळं – १

  • सफरचंद – ½

  • मध – १ चमचा (ऐच्छिक)

कृती :
१. सर्व फळं तुकडे करून मिक्सरमध्ये घ्या.
२. दूध/दही आणि मध घालून ब्लेंड करा.
३. थंडगार स्मुदी तयार!

.......................

हेल्दी न्यूडल्स

साहित्य :

  • गव्हाचे/मल्टिग्रेन नूडल्स – १ वाटी

  • गाजर, शिमला मिरची, मटार – १ कप (चिरलेले)

  • मीठ, मिरी, सोया सॉस – चवीनुसार

  • तेल – १ चमचा

कृती :
१. नूडल्स उकळून घ्या.
२. कढईत तेल गरम करून भाज्या परतून घ्या.
३. उकडलेले नूडल्स, मीठ-मसाले घालून नीट मिक्स करा.

.......................

ओट्स बाउल

साहित्य :

  • ओट्स – ½ कप

  • दूध – १ कप

  • सफरचंद/केळं/बेरीज – ½ कप (तुकडे)

  • मध किंवा ड्रायफ्रुट्स – थोडे

कृती :
१. दूध उकळून त्यात ओट्स शिजवा.
२. वाडग्यात काढून फळांचे तुकडे आणि ड्रायफ्रुट्स घाला.
३. हवं असल्यास वरून मध शिंपडा.

logo
marathi.freepressjournal.in