ब्लिचिंगनंतर जळजळ, कोरडेपणा जाणवतोय? 'या' मास्कने मिळवा नैसर्गिक चमक अन् नितळ त्वचा

ब्लिचिंगमधील केमिकल्स त्वचेचा नैसर्गिक ओलावा काढून घेतात, त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि संवेदनशील बनते. काही वेळा तर चेहऱ्यावर जळजळ, खाज, लालसरपणा किंवा पिंपल्ससुद्धा येऊ शकतात. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे.
ब्लिचिंगनंतर जळजळ, कोरडेपणा जाणवतोय? 'या' मास्कने मिळवा नैसर्गिक चमक अन् नितळ त्वचा
Published on

आजकाल सुंदर, उजळ आणि डागविरहित त्वचेसाठी अनेकजण ब्लिचिंगचा आधार घेतात. मात्र वारंवार ब्लिचिंग केल्यामुळे त्वचेला फायदे होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. ब्लिचिंगमधील केमिकल्स त्वचेचा नैसर्गिक ओलावा काढून घेतात, त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि संवेदनशील बनते. काही वेळा तर चेहऱ्यावर जळजळ, खाज, लालसरपणा किंवा पिंपल्ससुद्धा येऊ शकतात. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे.

ब्लिचिंगमुळे होणारे दुष्परिणाम

  • त्वचेचा नैसर्गिक रंग बिघडतो

ब्लिचिंगनंतर जळजळ, कोरडेपणा जाणवतोय? 'या' मास्कने मिळवा नैसर्गिक चमक अन् नितळ त्वचा
थंडीतही त्वचा राहील मुलायम! घरच्या घरी बनवा चमचाभर तुपापासून नॅचरल मॉईश्चरायझर
  • त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते

  • जळजळ, खाज आणि लालसरपणा जाणवतो

  • संवेदनशील त्वचेवर पिंपल्स किंवा डाग येण्याची शक्यता वाढते

  • त्वचा पातळ होऊन लवकर नुकसान होते

ब्लिचिंगनंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी?

ब्लिचिंग केल्यानंतर त्वचेला थंडावा आणि पोषण देणे महत्त्वाचे असते. अशावेळी केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स टाळून घरगुती उपायांचा अवलंब केल्यास त्वचा लवकर सावरते. नैसर्गिक घटक वापरल्यामुळे त्वचेला कोणताही साइड इफेक्ट होत नाही आणि त्वचा पुन्हा मऊ व चमकदार दिसू लागते.

ब्लिचिंगनंतर जळजळ, कोरडेपणा जाणवतोय? 'या' मास्कने मिळवा नैसर्गिक चमक अन् नितळ त्वचा
टाचांना पडलेल्या भेगा होतील गायब! फक्त १० रुपयांच्या तुरटीने मिळवा मुलायम पाय

त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा चारकोल मास्क

चारकोल मास्क हा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. तो त्वचेतील घाण, तेलकटपणा आणि मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो. विशेषतः ब्लिचिंगनंतर त्वचा शांत ठेवण्यासाठी हा मास्क उपयुक्त ठरतो.

चारकोल मास्कचे फायदे

  • त्वचेतील खोलवरची घाण स्वच्छ होते

  • ब्लिचिंगमुळे झालेली जळजळ कमी होते

  • त्वचा मऊ, स्वच्छ आणि ताजीतवानी दिसते

  • डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते

चारकोल मास्क तयार करण्यासाठी साहित्य

  • अ‍ॅक्टिवेटेड चारकोल पावडर

  • गुलाब पाणी

  • कोरफडीचा जेल

चारकोल मास्क बनवण्याची पद्धत

एका वाटीत अ‍ॅक्टिवेटेड चारकोल पावडर घ्या. त्यात गुलाब पाणी आणि कोरफडीचा जेल घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर समान पसरवा आणि सुमारे १०-१५ मिनिटे तसेच ठेवा. मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. नंतर हलका मॉइश्चरायझर लावा.

ब्लिचिंगनंतर जळजळ, कोरडेपणा जाणवतोय? 'या' मास्कने मिळवा नैसर्गिक चमक अन् नितळ त्वचा
Menstrual Masking : पीरियड ब्लड लावताय चेहऱ्यावर? तज्ज्ञ म्हणतात, "हा ट्रेंड थांबवा!"

महत्त्वाची सूचना

  • मास्क लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा

  • अतिसंवेदनशील त्वचा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या

  • आठवड्यातून एकदाच हा मास्क वापरा

ब्लिचिंगमुळे झालेला त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय हे सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. योग्य काळजी आणि नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास त्वचा निरोगी, उजळ आणि चमकदार राहू शकते.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in