Cooking Tips : भजी, वडे खूप तेल शोषून घेतात? वापरा शेफ पंकजने सांगितलेल्या २ ट्रिक, भजी तेलकट होणार नाहीत

शेफ पंकज यांनी सोशल मीडियावर काही कुकिंग ट्रिक्स शेअर केल्या आहेत. या ट्रिक्स वापरून तुम्ही कुरकुरीत, खमंग भजी बनवू शकता.
Cooking Tips
फॉलो करा २ टिप्स भजी तेलकट होणार नाहीतCanva
Published on

पावसाळ्यात हमखास अनेक घरांमध्ये कांदा - बटाटा भजी, मूग भजी तसेच बटाटे वडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. खिडकीतून दिसणारा रिमझिम पाऊस अनुभवत कांदा भजीचा आस्वाद घेणं ही मजा काही औरच असते. मात्र अनेकदा घरी भजी, वडे बनवताना ते खूप जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे खूप तेलकट भजी खाल्ल्याने आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. तेव्हा भजी जास्त तेलकट होऊ नये यासाठी शेफ पंकज यांनी सोशल मीडियावर काही कुकिंग ट्रिक्स शेअर केल्या आहेत. या ट्रिक्स वापरून तुम्ही कुरकुरीत, खमंग भजी बनवू शकता.

भजी जास्त तेलकट होऊ नये म्हणून काय करावं?

अनेकदा घरी भजी करताना ती खूप जास्त तेल शोषून घेते. अशावेळी शेफ पंकज यांनी भजी करण्यासंदर्भात दोन महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत.

Cooking Tips
Snake : पावसाळ्यात घरात साप शिरण्याची भीती वाटते? मग लावा हे एक झाड, साप जवळही येणार नाहीत

तेलाच्या तापमानाकडे लक्ष द्या :

शेफ पंकज यांच्या मते, भजी तळताना तेलाचं तापमान हे मिडीयम हॉट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या तेलात भजी सोडणार आहात ते तेल अगदी जास्त तापलेलं नको तसेच अगदी थंड सुद्धा नको. तेल खूप जास्त गरम असल्यास भजी लवकर सोनेरी रंगाच्या होतील मात्र त्या आतून कच्च्याच राहतील. तर तेल व्यवस्थित तापलं नसेल किंवा साधारण थंडच असेल तर भजी जास्त तेल शोषून घेतील. जर तुम्हाला तेल नीट गरम झाले आहे की नाही हे तपासायचं असेल तर गरम तेलात एक स्टिक घालून पाहा. जर स्टिक तेलात टाकल्या टाकल्या त्यातून बुडबुडे येऊ लागले म्हणजे तेल तळण्यासाठी तयार आहे असे समजावे.

तेलात मीठ घाला:

कढईत भजी तळण्यासाठी तेल घेतल्यावर त्या तेलात तुम्ही मीठ घालू शकता. तेलात मीठ घातल्याने भजी तेल जास्त शोषून घेत नाहीत. त्यामुळे तेलकट भजी न खाल्ल्याने आरोग्य सुद्धा चांगले राहते.

logo
marathi.freepressjournal.in