Sunday Special Breakfast Recipe: नाश्त्यासाठी काय बनवायचे याचा विचार करणे खूप कठीण काम आहे. त्यात आज सकाळपासून पाऊस पडत असल्यामुळे थंडगार वातावरण झाले आहे. अशावेळी तुम्ही काही तरी गरम आणि चटपटीत पदार्थाच्या शोधात असाल तर आम्ही एक डिश घेऊन आलो आहोत. सकाळचा नाश्ता हा प्रत्येक व्यक्तीच्या दिवसातील पहिला आणि महत्त्वाचा आहार असतो. म्हणूनच, जर तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे (Healthy breakfast) असेल तर सकाळी निरोगी नाश्ता करा. तुम्ही आज पोह्यांचा चिला बनवू शकता. पोहा चिल्ला हा पोह्यांपासून बनवला जाणारा पदार्थ घरी सहज बनवू शकता. चला जाणून घेऊया पोह्यांचा चिलाची रेसिपी.
लागणारे साहित्य
पोहे- १ वाटी
बेसन- १/२ कप
ओट्स पावडर- १/३ कप
मध्यम आकाराचा बारीक चिरलेला- १ कांदा
मध्यम आकाराचे बारीक चिरून - १ टोमॅटो
मध्यम आकाराचे किसलेले - १ गाजर
हिरवी मिरची- १ बारीक चिरून
कोथिंबीर- १ टीस्पून बारीक चिरून
हळद पावडर- १ टीस्पून
लाल मिरची पावडर- १ टीस्पून
धने पावडर - १ टीस्पून
तूप
चवीनुसार मीठ
हे ही वाचा
जाणून घ्या कृती
सर्व प्रथम पोहे धुवून दहा मिनिटे एका भांड्यात बाजूला ठेवा.
आता पोहे मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत बारीक करा. नंतर ओट्स पावडर आणि बेसन घालून चांगले मिक्स करा.
आता त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, गाजर आणि टोमॅटो घालून परत एकदा मिक्स करा. यानंतर त्यात हळद, धनेपूड, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही नीट मिसळा.
हे ही वाचा
यानंतर त्यात पाणी घालून पोह्याचे पीठ तयार करा आणि नॉन-स्टिक तव्यावर तूप लावून त्यावर पीठ घालून पसरवा.
आता ते दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
तुमचा पोहे चीला तयार आहे, चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.