
How to make Soyabean Pulao: पुलाव आणि बिर्याणी हे दोन्ही पदार्थ फार आवडीने खाल्ले जातात. नॉन व्हेज आणि व्हेज अशा दोन्ही प्रकारच्या या डिशेस बनवल्या जातात. हे दोन्ही पदार्थ झटपट तयार होतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी सोयाबीन पुलावची रेसिपी घेऊन आलो आहोत. रेगुलर पुलावपेक्षा सोयाबीन पुलावची चव पण तुम्हाला नक्कीच आवडेल. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. याचमुळे चवीसोबत आरोग्याचाही डोस मिळेल. सोयाबीन पुलाव ही एक डिश आहे जी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही बनवू शकता. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
१ कप सोयाबीन, १ कप तांदूळ,२ कप पाणी, २ चमचे तेल, १ कांदा, चिरलेला, २ लवंगा, लसूण, चिरलेला, १ इंच आले, किसलेले, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून धने पावडर, चवीनुसार मीठ, ताजी कोथिंबीर गार्निश
जाणून घ्या कृती
एक कप सोयाबीन १ तास भिजत ठेवा.
आता तांदूळ घ्या आणि शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा.
आता सोयाबीनचे पाणी गाळून दुसऱ्या भांड्यात ठेवा. पाणी काढून टाकण्यासाठी सोयाबीन नीट पिळून घ्या.
आता गॅस चालू करून मोहरीच्या तेलात सोयाबीन परतून घ्या.
आता एक पॅन घ्या आणि त्यात २ चमचे तेल आणि २ चमचे बटर घाला.
तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, २ लवंगा आणि अर्धा टीस्पून ओरेगॉन घाला.
आता त्यात किसलेला लसूण आणि हिरवी मिरची टाका.
लसूण सोनेरी झाल्यावर त्यात ७ ते ८ काजू, बेदाणे आणि चिरलेला कांदा घाला. कांदा लाल झाल्यावर त्यात तळलेले सोया घाला.
यामध्ये मीठ घालून सर्व साहित्य चांगले मिसळा. आता या मिश्रणात तांदूळ चांगले मिक्स करावे.वरून लिंबाचा रस घाला.
सजावटीसाठी वरती हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घाला.
गरमागरम सोया पुलाव तयार आहे. काकडीच्या रायत्यासोबत खा.