Aloo Pakoda Recipe: पावसाळ्यात फक्त २ कच्च्या बटाट्याने बनवा मसालेदार आणि कुरकुरीत लच्चा भजी

Batata Bhaji Recipe: पावसाळ्यातील थंडगार वातावरण गरमागरम भजी खाण्याचा मोह होत असेल तर तुम्ही बटाट्याची लच्चा भजी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी
Crispy Fried Aloo Lachcha Pakoda
how to make Spicy and Crispy lachha potatoes Bhaji nehascookbook
Published on

Monsoon Recipe: अनेक तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे वातावरण थंड होते. अशावेळी आपल्याला काहीतरी चटपटीत आणि गरम खावेसे वाटते. अशा वेळी अनेकवेळा आपल्याला असे वाटते की आपण कांद्याची भजी बनवावे, परंतु तीच तीच भजी पुन्हा पुन्हा खायला नको वाटते. मग अशावेळी तुम्ही बटाट्याची भजी बनवू शकता. ही भजी नेहमी सारखी न बनवता तुम्ही वेगळ्या स्टाईलने बनवू शकता. तुम्ही यंदा पावसाळ्यात मसालेदार आणि कुरकुरीत लच्चा भजी शकता. चला याची रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

  • २ कच्चे बटाटे

  • ४ चमचे बेसन

  • ३ चमचे तांदळाचे पीठ

  • २ हिरव्या मिरच्या

  • 3 चमचे चिरलेली कोथिंबीर

  • १ टीस्पून लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी तेल

Crispy Fried Aloo Lachcha Pakoda
Tomato Soup Recipe: पावसाळ्यात नाश्त्यासाठी बनवा टेस्टी टोमॅटो सूप, जाणून घ्या पद्धत

जाणून घ्या रेसिपी

  • सर्वप्रथम बटाटा सालीसोबत किंवा साल काढून जाड किसून घ्या.

  • आता किसून झाल्यावर हे किसलेले बटाटे दोन-तीनदा पाण्याने चांगले धुवून घ्या. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ५ मिनिटे पाण्यात ठेवूही शकता.

  • यातील पाणी नीट पिळून एका भांड्यात काढून घ्या.

Crispy Fried Aloo Lachcha Pakoda
Kanda Bhaji Recipe: थंडगार पावसात बनवा गरमा गरम मुंबई स्टाईल कांद्याची भजी, नोट करा रेसिपी
  • यानंतर प्रथम त्यात बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स करावे. त्यात पाणी अजिबात मिसळू नये हे लक्षात ठेवा.

  • आता उरलेले सर्व साहित्य बटाट्यात मिसळा आणि पाणी अजिबात घालू नका. हे मिश्रण बटाट्याच्या ओलाव्यापासून बनवायचे आहे.

Crispy Fried Aloo Lachcha Pakoda
Monsoon Recipe: तांदूळ आणि बटाट्यापासून १० मिनिटांत बनवा टेस्टी पकोडे, पावसाची मज्जा होईल द्विगुणित!
  • आता तेल गरम होऊ द्या आणि लक्षात ठेवा की तेलाचे तापमान जास्त गरम होऊ नये.

  • आता हे मिश्रण लहान लहान भजी सोडून तेलात टाकून तळून घ्या.

  • छान गोल्डन ब्राऊन झाल्यावर बाहेर काढा आणि आपल्या आवडीच्या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in