Onion Rings Recipe: पावसाळ्यात बनवा कांद्याच्या रिंग्स, जाणून घ्या सोपी रेसिपी

National Onion Day 2024 : राष्ट्रीय कांदा दिवस दरवर्षी २७ जून रोजी साजरा केला जातो. याच निमित्ताने कांद्याच्या रिंग्स कशा बनवायच्यायाची रेसिपी जाणून घ्या.
how to make tasty crunchy Onion Rings know recipe
Fried Onion Rings Freepik

Tea Time Monsoon Recipe: राष्ट्रीय कांदा दिवस दरवर्षी २७ जून रोजी साजरा केला जात. कांदा हा भारतीय स्वयंपाक घरातील फार महत्त्वाचा भाग आहे. हे अगदी कोणत्याही पदार्थाची चव सहज वाढवू शकते. याशिवाय कांदा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. राष्ट्रीय कांदा दिवस दरवर्षी यूएसमध्ये साजरा केला जातो. १९१३ मध्ये अमेरिकेतील कांदा उत्पादकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या नॅशनल ओनियन असोसिएशनच्या स्थापनेची आठवण म्हणून केला जातो. आजच्या या खास दिनी आपण कांद्याच्या रिंग्ज कशा बनवायच्या याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

लागणारे साहित्य

 • कांदा - २

 • मैदा - १/२ कप

 • कॉर्न फ्लोअर - २ चमचे

 • चिली फ्लेक्स - १/२ टीस्पून

 • कॉर्न फ्लेक्स क्रंब्स - १ कप

 • मिक्स हर्ब्स - १/२ टीस्पून

 • तेल - तळण्यासाठी

 • मीठ - चवीनुसार

how to make tasty crunchy Onion Rings know recipe
Kanda Bhaji Recipe: थंडगार पावसात बनवा गरमा गरम मुंबई स्टाईल कांद्याची भजी, नोट करा रेसिपी

जाणून घ्या कृती

 • कांद्याचे रिंग बनवण्यासाठी प्रथम कांद्याचे जाड गोलाकार तुकडे करा.

 • या तुकड्यातून प्रत्येक रिंग वेगळी करून घ्या.

 • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात मैदा आणि कॉर्न फ्लोअर घालून दोन्ही चांगले मिक्स करा.

 • यानंतर या पिठाच्या मिश्रणात मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

 • आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. पिठात गुठळ्या राहू देऊ नकात.

 • आता कढईत तेल टाकून गरम करा.

how to make tasty crunchy Onion Rings know recipe
Monsoon Recipe: तांदूळ आणि बटाट्यापासून १० मिनिटांत बनवा टेस्टी पकोडे, पावसाची मज्जा होईल द्विगुणित!
 • तेल गरम झाल्यावर कांद्याच्या रिंगांना मैदा-कॉर्न फ्लोअर पेस्टमध्ये बुडवा आणि छान कोट करून मग रिंग कॉर्न फ्लेक्स क्रंब्समध्ये बुडवून चांगले कोटिंग द्या.

 • कॉर्न फ्लेक्स क्रंब्स लावून झाल्यावर कांद्याचे रिंग पुन्हा एकदा पिठाच्या पेस्टमध्ये बुडवा आणि नंतर तळण्यासाठी तेलात सोडा.

 • कांद्याच्या रिंग्ज सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

 • यानंतर, ते एका प्लेटमध्ये काढा. नाश्त्यासाठी स्वादिष्ट कांद्याच्या रिंग्ज तयार आहेत.

 • या रिंग्स तुम्ही सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.

logo
marathi.freepressjournal.in