Rajasthani Moong Dal Paratha: नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी खायचे आहे? बनवा राजस्थानी मूग डाळ पराठा; नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या घाईच्या वेळेत तुम्ही हेल्दी आणि टेस्टी असा राजस्थानी मूग डाळ पराठा बनवू शकता.
Rajasthani Moong Dal Paratha: नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी खायचे आहे? बनवा राजस्थानी मूग डाळ पराठा; नोट करा रेसिपी
Freepik
Published on

Rajasthani Moong Dal Paratha Recipe: सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नये. नाश्ता हा आपल्या दिवसातील महत्त्वपूर्ण भाग आहे. सकाळी हेल्दी नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. पण अनेकदा सकाळी फार घाई होते. मग अशावेळी घाईच्या वेळेत काय तयार करावे हे समजत नाही. हा नाश्ता फक्त हेल्दीच नाही तर टेस्टी असावा असेही सगळ्यांचं वाटते. जर तुम्हीही नाश्त्याबद्दल अनेकदा चिंतेत असाल, तर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टसाठी राजस्थानी मूग डाळ पराठा ट्राय करून पाहू शकता.

लागणारे साहित्य

  • १ कप पीठ

  • १/२ कप धुतलेली मूग डाळ

  • १ हिरवी मिरची (चिरलेली)

  • १/२ टीस्पून जिरे

  • एक चिमूटभर हिंग

  • १/२ टीस्पून हळद

  • १/४ टीस्पून बडीशेप

  • १/४ टीस्पून कलोंजीच्या बिया

  • १/२ टीस्पून गरम मसाला

  • १ टीस्पून लाल मिरची पावडर

  • आवश्यकतेनुसार कोथिंबीर

  • आवश्यकतेनुसार तेल/तूप

  • चवीनुसार मीठ

Rajasthani Moong Dal Paratha: नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी खायचे आहे? बनवा राजस्थानी मूग डाळ पराठा; नोट करा रेसिपी
Monsoon Care: मान्सूनमध्ये 'या' आजारांपासून रहा सावधान! जाणून घ्या लक्षणं

जाणून घ्या कृती

  • सर्व प्रथम मूग डाळ नीट धुवा आणि नंतर काही तास पाण्यात भिजत ठेवा.

  • डाळ मऊ झाल्यावर, जास्तीचे पाणी काढून टाका आणि एका भांड्यात पीठ आणि तिखट टाका.

  • नंतर लाल मिरची पावडर, बडीशेप, कलोंजीच्या बिया, हळद, हिंग, गरम मसाला, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Rajasthani Moong Dal Paratha: नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी खायचे आहे? बनवा राजस्थानी मूग डाळ पराठा; नोट करा रेसिपी
Moong Dal Idli Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा मूग डाळ इडली, चवीसोबत मिळेल पोषण; जाणून घ्या रेसिपी
  • आता या मिश्रणात हळूहळू पाणी घाला, सर्वकाही एकत्र करा आणि एक गुळगुळीत पीठ मळून घ्या.

  • नंतर पीठ ओल्या कापडाने सुमारे ३० मिनिटे बाजूला झाकून ठेवा.

  • त्यावर थोडे तूप लावून पुन्हा मळून घ्या. पीठाचे समान आकाराचे भाग करा आणि बेलण्याच्या मदतीने ते लाटून घ्या.

Rajasthani Moong Dal Paratha: नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी खायचे आहे? बनवा राजस्थानी मूग डाळ पराठा; नोट करा रेसिपी
Healthy Smoothie Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी स्मूदी
  • मध्यम आचेवर तवा गरम करून त्यावर पराठा ठेवा.

  • एका बाजूने शिजू द्या आणि नंतर वळवून दुसऱ्या बाजूला शिजू द्या. तूप लावून गरमागरम सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in