
रंगांचा सण होळी आता जवळ आलाय. सर्वजण रंग खेळण्यासाठी आतूर आहेत. होळी सेलिब्रेशन, होळी पार्टीसाठी जंगी तयारी करण्यात येत आहे. रंग खेळायला तर आवडतोच पण या सगळ्यांमध्ये मनात कुठेतरी भीती आणि काळजी वाटते विशेष करून केसांची. तर या काळजीला दूर सारा आणि मनसोक्त रंग खेळा. कारण या छोट्या-छोट्या ट्रिक्स फॉलो केल्या तर केसांमधील रंग चुटकीसरशी दूर होईल.
रंग खेळण्यापूर्वी केसांची काळजी
रंग खेळण्यापूर्वी केसांची काळजी घेताना काही गोष्टी टाळणे महत्त्वाचे आहे. जसे की केस मोकळे सोडणे, तेल लावणे इत्यादी. याविषयीची माहिती खालील लिंकवर सविस्तर वाचा...
रंग खेळल्यानंतर अशी घ्या काळजी
केसांचा गुंताडा प्रथम सोडवा
रंग खेळून झाल्यावर ताबडतोब केस धुवू नका. सर्वप्रथम केसांचा गुंताडा झाला असेल तर तो हलक्या हाताने बोटांचा वापर करत हळूहळू सोडवा. वेणी किंवा आंबाडा बांधला असेल तर तो हळूहळू सोडवा.
रंग काढण्यासाठी कंगव्याचा वापर करा
केस सोडवल्यानंतर प्रथम कंगव्याने हळूहळू केसांमधील शक्य तितका रंग काढून घ्या. यामुळे केस धुताना जास्त मेहनत रावी लागणार नाही.
केस धुताना घ्यावयाची काळजी
केस धुताना थेट शाम्पू किंवा कंडिशनर वापरू नये. शाम्पू किंवा कंडिशनरमध्ये अनेक रसायने असतात. त्यांची रंगांसोबत सायनिक अभिक्रिया होऊ शकते. परिणामी केस खराब होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो प्रथमतः केस धुताना फक्त साध्या पाण्याने केस धुवावे. जास्तीत जास्त रंग पाण्याद्वारे स्वच्छ होईल याची काळजी घ्यावी.
केसांना नैसर्गिक पॅक लावावा
पाण्याने केस धुतल्यानंतर केसांमध्ये मुलतानी माती, अलोवेरा जेल, जास्वंद जेल यांनी नैसर्गिक हेअर पॅक तयार करा. हे पॅक केसांना लावून ठेवावा. साधारण किमान १५ ते २० मिनिटे हा पॅक केसांमध्ये ठेवावा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत.
केसांना मालिश करा
केस कोरडे झाल्यानंतर केसांना कोमट तेल लावून हलक्या हाताने मालीश करा.
दुसऱ्या दिवशी करा शाम्पूचा वापर
दुसऱ्या दिवशी अतिरिक्त तेल आणि उरलेला रंग काढण्यासाठी कमीत कमी शाम्पू वापरून केस धुवून काढा.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)