Pre-Diabetes: तुम्ही प्री-डायबेटिक आहात? 'अशी' काळजी घ्या

Health Care: शरीरात तयार होणारे इन्‍सुलिन प्रभावीपणे काम करत नाही तेव्‍हा प्रीडायबेटिस होते, ज्‍यामुळे प्री-डायबेटिक व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या उच्‍च असतात, पण त्‍या मधुमेह झाल्‍याचे निदान होण्‍यासाठी पुरेशा नसतात.
Pre-Diabetes: तुम्ही प्री-डायबेटिक आहात? 'अशी' काळजी घ्या
Freepik
Published on

Diabetes Care: शरीरात तयार होणारे इन्‍सुलिन प्रभावीपणे काम करत नाही तेव्‍हा प्रीडायबेटिस होते, ज्‍यामुळे प्री-डायबेटिक व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या उच्‍च असतात, पण त्‍या मधुमेह झाल्‍याचे निदान होण्‍यासाठी पुरेशा नसतात. यासंदर्भात हस्‍तक्षेप करण्‍याचा हा सर्वात महत्त्‍वाचा टप्‍पा आहे आणि योग्‍य वैद्यकीय केअर व जीवनशैलीत बदलांची आवश्‍यकता असते.

लिना डायबेटिस केअर अँड मुंबई डायबेटिस रिसर्च सेंटर अंधेरी वेस्‍टचे संचालक आणि कन्‍सल्‍टण्‍ट डायबेटोलॉजिस्‍ट डॉ. मनोज चावला म्‍हणाले, “संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, दशकापासून उपासमार आणि अन्‍न असुरक्षिततेमुळे भारतीयांच्‍या शरीरामध्‍ये चरबीचे प्रमाण कमी न होता ‘उपासमारी'मुळे आवश्‍यक अवयवांभोवती चरबी वाढत आहे आणि यामुळे मधुमेह व हृदयविषयक आजारांचा धोका वाढतो. याबाबत भर म्‍हणजे शारीरिक व्‍यायामाचा अभाव आणि कर्बोदके व गोड पदार्थांचा समावेश असलेल्‍या आहाराचे सेवन. संशोधनामधून निदर्शनास आले आहे की मधुमेह आणि कार्डियोव्‍हॅस्‍कुलर समस्‍यांमध्‍ये संबंध आहे, ज्‍यामुळे भविष्‍यात गुंतागुंती वाढण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी याबाबत जागरूकतेचा प्रसार अत्‍यंत आवश्‍यक आहे. म्‍हणून, प्रीडायबेटिक व्‍यक्‍तींना त्‍यांचे आरोग्‍य उतम राखण्‍यास मदत करण्‍यासाठी जनजागृती अत्‍यंत महत्त्वाची आहे.''

Pre-Diabetes: तुम्ही प्री-डायबेटिक आहात? 'अशी' काळजी घ्या
Health Care: जीवघेणे ठरू शकणारे आणि डासांमार्फत संक्रमित होणारे पाच आजार

प्रीडायबेटिसबाबत काळजी घेतल्‍याने व्‍यक्‍तींना आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी सक्रिय पावले उचलण्‍यास मदत होते. आरोग्‍यदायी जीवनशैलीचा अवलंब करत आणि वजन नियंत्रणात राखल्‍याने इतर गंभीर आजारांना प्रतिबंध करण्‍यास मदत होऊ शकते. यामधून खात्री मिळते की, व्‍यक्‍ती त्‍यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याची दीर्घकाळापर्यंत काळजी घेतील. यामुळे शारीरिक कार्यांमध्‍ये सुधारणा देखील होऊ शकते, ऊर्जा पातळ्या वाढू शकतात, आत्‍मविश्‍वास मिळू शकतो आणि भावनांचे उत्तमरित्‍या नियमन करण्‍यास मदत होऊ शकते. हार्मोनल असंतुलन किंवा पीसीओएसने पीडित महिलांसाठी गुणकारी जीवनशैली व्‍यवस्‍थापन या स्थितींचा सामना करण्‍यास मदत करू शकते.

logo
marathi.freepressjournal.in