Healthy Easy Recipe: दिवसभराच्या धावपळीची भरपूर ऊर्जा लागते. ही ऊर्जा आपल्याला सकाळच्या नाश्त्यातून मिळते. या नाश्त्यासाठी फलाफलसारख्या स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेता आला तर? यापेक्षा चांगले काय असू शकते? फलाफल हा स्वादिष्ट पदार्थ अरब मध्य पूर्वेतून येतो जो भारतातील अनेक लोकांच्या पसंतीस उतरला आहे. दरवर्षी १२ जून रोजी आंतरराष्ट्रीय फलाफल दिवस साजरा केला जातो. फलाफल हे एक आरोग्यदायी पदार्थ आहे जे तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकता. ज्यांनी अद्याप फलाफल खाल्ले नाही अशा सर्वांनी आम्ही दिलेली रेसिपी फॉलो करून आवर्जून हा पदार्थ बनवावा. फलाफल हा चण्यापासून बनवलेला एक स्वादिष्ट, कुरकुरीत नाश्ता आहे जो विविध प्रकारे सर्व केला जातो. चला फलाफलची रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
चणे -२५० ग्रॅम
कोथिंबीर - १० ग्रॅम
धणे पावडर - ५ ग्रॅम
कांदा - १/२
चवीनुसार मीठ
लसूण - ३-४
हे ही वाचा
जाणून घ्या कृती
चणे रात्रभर (१२ तास) पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी कुकरमध्ये मऊ होईपर्यंत प्रेशर शिजवा.
उकडल्यावर पाणी पूर्णपणे काढून टाका आणि कोरडे होऊ द्या
बाकीचे सर्व साहित्य त्यात टाका आणि छान मिक्स करा. लक्षात घ्या बारीक पेस्ट होईपर्यंत मिसळू नका.
आपला हात ग्रीस करा आणि लहान गोळे करा.
हे गोळे ओरिजनल रेसिपी नुसार डीप फ्राय करू शकता किंवा हेल्दी बनवण्यासाठी बेक किंवा एअर फ्राय करु शकता.
अशाप्रकारे तुमचे यम्मी फलाफेल्स तयार आहेत.
फलाफल विविध प्रकारे सर्व्ह केले जाऊ शकतात. तुम्ही हे असेच खाऊ शकता किंवा याची फ्रँकी बनवूनही खाऊ शकता.