कैरी पन्हं: उन्हाळ्यात शीतपेयाला उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे

कैरीपासून उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे कैरीचं पन्हं (Kairi Panha) हे खास पेय बनवण्याची परंपरा आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या त्रासापूसन कैरीचं पन्हं बचाव करतो. जाणून घेऊया याचे फायदे
कैरी पन्हं: उन्हाळ्यात शीतपेयाला उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे
Youtube MadhurasRecipe Marathi
Published on

आपल्या भारतीय परंपरेत ऋतूनुसार येणारी फळे आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचे संकेत आहेत. प्रत्येक ऋतूनुसार येणारी फळे त्या ऋतूतील आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात हे आपल्या पूर्वजांनी जाणले होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागलेल्या असतात. या कैरीपासून उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे कैरीचं पन्हं (Kairi Panha) हे खास पेय बनवण्याची परंपरा आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या त्रासापूसन कैरीचं पन्हं बचाव करतो. जाणून घेऊया याचे फायदे

शीतपेयाला उत्तम पर्याय

उन्हाळा लागला की आपोआपच शीतपेय (कोल्ड ड्रिंक-सॉफ्ट ड्रिंक) प्यावेसे वाटतात. मात्र, कार्बोनेटेड केलेली शीतपेय आरोग्यासाठी घातक असतात. यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. तर भारतीय पारंपारिक आणि नैसर्गिक पेय शीतपेयाला उत्तम पर्याय असतात. कैरीचं पन्हं हे असेच पेय आहे. उन्हाळ्यात कच्ची आंबट कैरी खाण्याचे फायदे अनेक असतात. तसेच या कैरीचं लोणचं, चटणी असे विविध पदार्थ तयार करतात येते. त्यांचा आहारातील समावेश आरोग्याला फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे कैरीचं पन्हं हे देखील आरोग्याला फायदेशीर ठरते.

इथे वाचा रेसिपी

कैरी पन्हं: उन्हाळ्यात शीतपेयाला उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे
आला उन्हाळा, आरोग्यदायी कैरीचं पन्हं कसं बनवतात? जाणून घ्या रेसिपी

कैरीचं पन्हं (Kairi Panha) पिण्याचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कैरीमध्ये 'क' आणि 'के' ही दोन्ही जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात या विविध कारणांमुळे शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे 'क' जीवनसत्त्वाची आवश्यकता अधिक असते. याच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. कैरीचं पन्हं पिल्यामुळे 'क' जीवनसत्त्व मिळते. त्यामुळे थकवा नाहीसा होतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

शरीराला गारवा मिळतो

कैरी ही थंड गुणाची असल्यामुळे कैरीचं पन्हं हे देखील थंड असते. उन्हाळ्यात सातत्याने थंड प्यावेसे वाटते. अशा वेळी कैरीचं पन्हं पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला गारवा मिळतो.

गुळाचे फायदे

ऊन लागले की त्यावर जुने लोक गुळ खाण्यासाठी प्राधान्य देत असे. यामुळे ऊन लागले असेल तर ते उतरते. कैरीचं पन्हं बनवताना गुळाचा उपयोग केला जातो. त्यामुळे कडक उन्हातून आल्यावर थोडा वेळानंतर कैरीचं पन्हं पिल्याने बरे वाटते.

उष्माघाताच्या त्रासापासून बचाव

कैरीचं पन्हं पिल्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या उष्माघाताच्या त्रासापासून बचाव होतो.

logo
marathi.freepressjournal.in