कांद्याचा पराठा लाटताना फुटतो? मग 'ही' सोपी ट्रिक वापरा आणि बनवा कुरकुरीत पराठा

नाश्त्याला काय बनवायचं, हा रोजचाच प्रश्न. कांदापोहे, उपमा, शिरा हे नेहमीचे पदार्थ करून कंटाळा येतो. अशावेळी घरच्यांना आवडेल असा झटपट आणि चविष्ट पर्याय म्हणजे कांद्याचा पराठा. मात्र पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येतं आणि पराठा फुटतो, ही अनेकांची तक्रार असते. योग्य पद्धत वापरली तर हा त्रास टाळता येतो.
कांद्याचा पराठा लाटताना फुटतो? मग 'ही' सोपी ट्रिक वापरा आणि बनवा कुरकुरीत पराठा
कांद्याचा पराठा लाटताना फुटतो? मग 'ही' सोपी ट्रिक वापरा आणि बनवा कुरकुरीत पराठा'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

नाश्त्याला काय बनवायचं, हा रोजचाच प्रश्न. कांदापोहे, उपमा, शिरा हे नेहमीचे पदार्थ करून कंटाळा येतो. अशावेळी घरच्यांना आवडेल असा झटपट आणि चविष्ट पर्याय म्हणजे कांद्याचा पराठा. मात्र पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येतं आणि पराठा फुटतो, ही अनेकांची तक्रार असते. योग्य पद्धत वापरली तर हा त्रास टाळता येतो.

कांद्यात मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे सारण बनवताना आणि पराठा लाटताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया सोपी आणि खात्रीशीर पद्धत.

कांद्याचा पराठा लाटताना फुटतो? मग 'ही' सोपी ट्रिक वापरा आणि बनवा कुरकुरीत पराठा
खूप खाल्ली कांदा भजी, आता बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग; चव अशी की बाहेरचं फास्ट फूड विसराल

साहित्य

  • गव्हाचं पीठ

  • बारीक चिरलेला कांदा

  • कोथिंबीर

  • कसुरी मेथी

  • लाल तिखट

  • हळद

  • धणे-जिरे पावडर

  • चाट मसाला

  • गरम मसाला

  • हिरवी मिरची

  • भाजलेले बेसन

  • मीठ

  • तूप

कृती
एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घाला. आवश्यक तेवढं पाणी घालून थोडी जाडसर कणिक मळून घ्या. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कसुरी मेथी, धणे-जिरे पावडर, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट, थोडंसं भाजलेलं बेसन आणि मीठ एकत्र करा. कणकेचा छोटा गोळा घेऊन पारी बनवा. त्यात कांद्याचं मिश्रण भरा आणि कडा नीट बंद करा. हलक्या हाताने पराठा लाटा. पोलपाट ओला ठेवू नका. गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजा. वरून तूप लावा.

कांद्याचा पराठा लाटताना फुटतो? मग 'ही' सोपी ट्रिक वापरा आणि बनवा कुरकुरीत पराठा
ब्लड प्रेशरची चिंता वाढलीय? आठवड्याभरात फरक जाणवेल; सकाळी प्या 'ही' हेल्दी पेयं

गरमागरम कांद्याचा पराठा हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. योग्य पद्धतीने केल्यास पराठा अजिबात फुटत नाही आणि चवही अप्रतिम लागते. झटपट तयार होणारा हा पदार्थ नाश्ता किंवा जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

(टिप: कांद्याला आधी मीठ टाकून जास्त वेळ ठेवू नका. नाहीतर पाणी सुटेल आणि पराठा फुटू शकतो.)

logo
marathi.freepressjournal.in