दररोजच्या जेवणासाठी परफेक्ट; झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी, एकदा नक्की ट्राय करा

झटपट तयार होणारी आणि हलकीफुलकी असलेली ही खान्देशी ज्वारी कढी रोजच्या जेवणात एक उत्तम पर्याय ठरू शकते.
दररोजच्या जेवणासाठी परफेक्ट; झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी, एकदा नक्की ट्राय करा
दररोजच्या जेवणासाठी परफेक्ट; झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी, एकदा नक्की ट्राय करा(Photo-@sanjeevkapoor)
Published on

खान्देशातील पारंपरिक पदार्थांमध्ये कढीला एक खास स्थान आहे. साध्या कढीत ज्वारीच्या पिठाचा समावेश केल्याने तिची चव अधिक रुचकर होतेच, शिवाय पौष्टिकताही वाढते. झटपट तयार होणारी आणि हलकीफुलकी असलेली ही खान्देशी ज्वारी कढी रोजच्या जेवणात एक उत्तम पर्याय ठरू शकते.

दररोजच्या जेवणासाठी परफेक्ट; झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी, एकदा नक्की ट्राय करा
Sunday Special Recipe : फिश लव्हर्ससाठी खास! मालवणी स्टाईल सुरमई करी; ट्राय करा सोपी रेसिपी

साहित्य :

  • दही - १ कप

  • बेसन - २ टेबलस्पून

  • ज्वारी पीठ - १ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - २ टेबलस्पून

  • मोहरी - १/२ टीस्पून

  • जिरे - १ टीस्पून

  • हिंग - १/२ टीस्पून

  • कढीपत्ता पाने - ८ ते १०

  • ठेचलेले आले-लसूण-हिरवी मिरची - १/२ टेबलस्पून

  • गूळ (चिरलेला) - १ टेबलस्पून

  • कोथिंबीर (चिरलेली) - २ टेबलस्पून

  • पाणी - ३ कप

दररोजच्या जेवणासाठी परफेक्ट; झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी, एकदा नक्की ट्राय करा
तिखटप्रेमींसाठी खास! झणझणीत सावजी पनीर मसाला; घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल डिश

कृती :

एका भांड्यात दही, बेसन आणि ज्वारी पीठ एकत्र घेऊन छान फेटून घ्या. त्यात मीठ आणि ३ कप पाणी घालून नीट एकजीव करा. कढईत तेल गरम करून मोहरी टाका. ती तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता आणि आले-लसूण-हिरव्या मिरचीचे मिश्रण घालून ३० सेकंद परता. आता तयार केलेले दह्याचे मिश्रण घालून नीट ढवळा. उकळी आल्यावर त्यात गूळ घाला. आच कमी करून १० ते १२ मिनिटे सतत ढवळत शिजवा. शेवटी कोथिंबीर घालून मिसळा आणि गरमागरम सर्व्ह करा.

दररोजच्या जेवणासाठी परफेक्ट; झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी, एकदा नक्की ट्राय करा
घरच्या घरी बनवा गुलाब जामुन खीर; पाहुण्यांना आवडेल खास डेझर्ट, वाचा रेसिपी

टिप्स :

  • कढीत गाठी न पडण्यासाठी दही, बेसन आणि ज्वारी पीठ चांगले फेटणे आवश्यक आहे.

  • आच मंद ठेवल्यास कढी फाटत नाही आणि चवही छान लागते.

  • गूळ आपल्या चवीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • अधिक झणझणीत चव हवी असल्यास हिरव्या मिरच्या वाढवू शकता.

  • भात किंवा भाकरीसोबत ही कढी अतिशय चविष्ट लागते.

logo
marathi.freepressjournal.in