Kitchen Hygiene Tips: तुम्हीही भाज्या आणि चिकनसाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरता? मग 'हे' वाचाच

भाज्या, फळं आणि कच्चं चिकन कापण्यासाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चॉपिंग बोर्ड कसा स्वच्छ ठेवावा, कधी बदलावा आणि एका अन्नपदार्थातील जंतू दुसऱ्या अन्नपदार्थात पसरण्याचा धोका कसा टाळावा, ते जाणून घ्या.
Kitchen Hygiene Tips: तुम्हीही भाज्या आणि चिकनसाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरता? मग 'हे' वाचाच
Kitchen Hygiene Tips: तुम्हीही भाज्या आणि चिकनसाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरता? मग 'हे' वाचाच'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

स्वयंपाकघरात चॉपिंग बोर्डचा वापर जवळजवळ रोजच होतो. फळं, भाज्या, ब्रेडपासून ते कच्चं चिकन किंवा मांस कापण्यासाठी अनेकदा घरात एकाच बोर्डचा वापर केला जातो. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्यच असेल असं नाही. कारण कच्च्या मांसामधील जंतू बोर्डवर राहून पुढे इतर खाद्यपदार्थांमध्ये जाऊ शकतात.

एकच चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर ही काळजी घ्या

कच्चं चिकन, मांस किंवा सीफूड कापल्यानंतर त्याच बोर्डवर लगेच सॅलड किंवा फळं कापणं टाळा. शक्य असल्यास कच्च्या मांसासाठी आणि भाज्या-फळांसाठी वेगळे चॉपिंग बोर्ड ठेवा. यामुळे एका अन्नपदार्थातील जंतू दुसऱ्या अन्नपदार्थात पसरण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

Kitchen Hygiene Tips: तुम्हीही भाज्या आणि चिकनसाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरता? मग 'हे' वाचाच
अक्षय कुमारच्या घरात झुरळं-मुंग्यांना नो एंट्री! ट्विंकल खन्ना वापरते 'या' २ घरगुती गोष्टी

फक्त पाण्याने धुणं पुरेसं नाही

बोर्ड वापरल्यानंतर तो केवळ पाण्याखाली धरून ठेवू नका. डिशवॉशिंग लिक्विड आणि स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवा. त्यानंतर पूर्णपणे वाळू द्या. सतत ओलसर राहणाऱ्या बोर्डवर जंतू वाढण्याची शक्यता अधिक असते.

या खुणा दिसल्या तर बोर्ड बदला

चाकूमुळे बोर्डवर खोल खाचा पडल्या असतील, तडे गेले असतील किंवा पृष्ठभाग खूप झिजला असेल तर तो स्वच्छ करणं कठीण होतं. अशा जागांमध्ये अन्नकण अडकू शकतात. बोर्डला कायम दुर्गंधी येत असेल किंवा लाकडी बोर्ड बराच वेळ ओलावा धरून ठेवत असेल तर नवीन बोर्ड घेण्याची वेळ आली आहे.

Kitchen Hygiene Tips: तुम्हीही भाज्या आणि चिकनसाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरता? मग 'हे' वाचाच
फ्रिजवर कव्हर घालता? मग ही बातमी एकदा नक्की वाचा; कंपन्या का देतात 'नो कव्हर'चा सल्ला?

लाकडी असो किंवा प्लॅस्टिक, सहज स्वच्छ होणारा आणि पटकन वाळणारा बोर्ड निवडणं सर्वात महत्त्वाचं आहे.

logo
marathi.freepressjournal.in