Summer Special : कोकम सरबत रेसिपी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट कूलिंग ड्रिंक

उन्हाळ्यातील थंडगार आणि आरोग्यदायी कोकम सरबत रेसिपी जाणून घ्या. घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार होणारे हे पारंपरिक पेय उष्णतेपासून दिलासा देते.
Summer Special : कोकम सरबत रेसिपी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट कूलिंग ड्रिंक
Summer Special : कोकम सरबत रेसिपी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट कूलिंग ड्रिंक'एआय' ने बनविलेली प्रतिमा
Published on

उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची गरज वाढते. अशातच पारंपरिक 'कोकम सरबत' हे चवदार आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून ओळखले जाते. उष्णतेमुळे होणारी जळजळ, डिहायड्रेशन आणि थकवा कमी करण्यासाठी कोकम सरबत अतिशय फायदेशीर ठरते. घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी उन्हाळ्यात नक्की करून पाहा.

Summer Special : कोकम सरबत रेसिपी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट कूलिंग ड्रिंक
Summer Special : उन्हाळ्यात थंडावा देणारे खास पेय; वाचा 'कोकोनट लाइम कूलर' ची सोपी रेसिपी

साहित्य :

  • कोकम - १ वाटी

  • पाणी - २ ते ३ कप

  • भाजलेली जिरे पूड - २ चमचे

  • काळं मीठ (चवीनुसार)

  • साखर (चवीनुसार)

Summer Special : कोकम सरबत रेसिपी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट कूलिंग ड्रिंक
घरच्या घरी बनवा गुलाब जामुन खीर; पाहुण्यांना आवडेल खास डेझर्ट, वाचा रेसिपी

कृती :

सर्वप्रथम कोकम स्वच्छ धुऊन ३ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर कोकम मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या. एका भांड्यात कोकमाचा रस काढून त्यात साखर, जिरे पूड आणि काळं मीठ घालून चांगले मिसळा. हे मिश्रण गॅसवर थोडावेळ उकळवा, जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळेल. तयार सिरप थंड झाल्यावर बाटलीत साठवून ठेवा. सर्व्ह करताना एका ग्लासमध्ये १-२ चमचे सिरप घ्या, त्यात थंड पाणी आणि बर्फ घालून सर्व्ह करा.

Summer Special : कोकम सरबत रेसिपी; उन्हाळ्यासाठी परफेक्ट कूलिंग ड्रिंक
SUMMER SPECIAL : बेस्ट रिफ्रेशिंग ड्रिंक! उन्हाळ्यात बनवा मिंट जलजीरा

टिप्स :

  • कोकम सरबत अधिक चवदार बनवण्यासाठी पुदिन्याची पाने घालू शकता.

  • जास्त दिवस टिकवण्यासाठी सिरप फ्रिजमध्ये स्टोअर करा.

  • साखरेऐवजी गूळ वापरल्यास अधिक हेल्दी पर्याय मिळतो.

  • सर्व्ह करताना थोडा लिंबाचा रस घातल्यास चव आणखी वाढते.

  • थंडगार सर्व्ह केल्यास याची चव चांगली लागते.

logo
marathi.freepressjournal.in