
Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi for friends)आहेत.
आनंद घ्या 'या' जोक्सचा
> कधी कधी असं वाटत,
सगळ सोडून द्याव,
आणि
हिमालयात निघून जाव…
पण
मग पुन्हा मनात विचार येतो,
तिथं जर नेट चालल नाही मग…!
> वय 18 – अपना टाईम आयेगा…
वय 25 – अपना टाईम आयेगा…
वय 35 – अपना टाईम आयेगा…
वय 45 – अपना टाईम आयेगा…
म्हातारपणी,,,
डॉक्टर – रिश्तेदारो को बुला लो,
इनका टाईम आ गया है…!
> बंड्या १ किलो लाडू खातो
आणि
पैसे न देताच तिथून जाण्याचा प्रयत्न करतो,
दुकानदार – ओ भाऊ, पैसे तर द्या…
बंड्या – पैसे तर नाहीये…
दुकानदार बंड्याला लई धुतो,,,
बंड्या कपडे झटकत उठतो
आणि म्हणतो,
“भाऊ ह्याच भावात आणखी १ किलो मोजा…”
जोक स्त्रोत - सोशल मीडिया
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)