Evening Snack Idea : उरलेला भात फेकून देताय? १० मिनिटांत बनवा कुरकुरीत 'राईस कुरकुरे'; संध्याकाळच्या स्नॅकसाठी बेस्ट पर्याय

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे 'राईस कुरकुरे' बनवणे सोपे असून साहित्यही अगदी घरगुती आहे. चला तर मग जाणून घेऊया ही खास रेसिपी.
Evening Snack Idea : उरलेला भात फेकून देताय? १० मिनिटांत बनवा कुरकुरीत 'राईस कुरकुरे'; संध्याकाळच्या स्नॅकसाठी बेस्ट पर्याय
(Photo-@sanjeevkapoor)
Published on

घरात उरलेला भात अनेकदा वाया जातो. पण हाच भात वापरून तुम्ही संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी हलका, कुरकुरीत आणि चटपटीत स्नॅक तयार करू शकता. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे 'राईस कुरकुरे' बनवणे सोपे असून साहित्यही अगदी घरगुती आहे. चला तर मग जाणून घेऊया ही खास रेसिपी.

साहित्य :

मुख्य मिश्रणासाठी:

  • उरलेला शिजलेला भात - १ कप

  • बेसन - अर्धा टीस्पून

  • कॉर्नफ्लोअर - २ ते अडीच टेबलस्पून

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • पाणी -आवश्यकतेनुसार

  • तेल- तळण्यासाठी

मसाला मिश्रणासाठी:

  • चाट मसाला - १ टीस्पून

  • सायट्रिक ॲसिड - (ऐच्छिक)

  • लाल तिखट - अर्धा टीस्पून

कृती :

उरलेला भात मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात अर्धा कप पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट मोठ्या भांड्यात काढून त्यात बेसन, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, हळद, बेकिंग सोडा आणि मीठ घाला. त्यात थोडे थोडे पाणी घालून गुळगुळीत आणि घट्टसर पीठ तयार करा. तयार मिश्रण सॉसच्या बाटलीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरा. शेव बनवण्याचा साचा असेल तर उत्तमच. एका कढईत तेल गरम करा. गरम तेलात मिश्रणाचे बारीक स्ट्रिप्स दाबून सोडा आणि सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. किचन पेपरवर काढून त्यातील अतिरिक्त तेल निथळू द्या. एका वेगळ्या भांड्यात चाट मसाला, सायट्रिक ॲसिड आणि लाल तिखट मिसळा. त्यात तळलेले कुरकुरे घालून हलकेच टॉस करा.गरमागरम चहासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • पीठ खूप पातळ नसावे. पीठ मध्यम घट्ट ठेवा म्हणजे कुरकुरे छान फुलतात.

  • अधिक चटपटीत चव हवी असल्यास थोडे गरम मसाला किंवा काळं मीठ घालू शकता.

  • सायट्रिक ॲसिड नसल्यास थोडी आमचूर पावडर वापरू शकता.

  • पूर्ण थंड झाल्यावर एअरटाइट डब्यात ठेवल्यास ३-४ दिवस टिकतात.

logo
marathi.freepressjournal.in