

आजच्या डिजिटल युगात प्रेम, नातं आणि संवाद सगळंच बदललं आहे. पूर्वी ‘प्रपोज’ आणि ‘कमिटमेंट’ हे शब्द महत्त्वाचे होते, पण आता तर Gen Z पिढीचं स्वतःचं डेटिंग वर्ल्ड आणि शब्दसंग्रह तयार झालं आहे! इंस्टाग्राम डीएमपासून ते डेटिंग ॲप्सपर्यंत, या पिढीच्या प्रेमकहाण्या ‘रिअल’पेक्षा जास्त ‘रिझ’ आणि ‘सिच्युएशनशिप’मध्ये जगतात. चला तर मग जाणून घेऊया या नव्या ‘डेटिंग डिक्शनरी’मधले काही भन्नाट शब्द आणि त्यांचा अर्थ!
हा शब्द सध्या सगळ्यात जास्त ऐकायला मिळतो. दोन व्यक्तींमध्ये एकमेकांप्रती भावना असतात, ते एकत्र वेळ घालवतात, पण नातं “गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड” असं ठरलेलं नसतं. म्हणजेच प्रेम आहे, पण ‘कमिटमेंट’ नाही! अशा नात्याला म्हणतात सिच्युएशनशिप.
हा शब्द Charisma म्हणजेच आकर्षण या शब्दावरून आला आहे. कोणालाही आपल्या व्यक्तिमत्त्वाने, बोलण्याने किंवा हावभावाने सहज इम्प्रेस करण्याची कला म्हणजेच रिझ.
अधूनमधून मेसेज पाठवणं, थोडं फ्लर्ट करणं म्हणजे समोरच्याचं लक्ष आपल्याकडे ठेवण्यासाठी छोटे छोटे एफर्ट्स घेणं. पण त्या नात्यात कधीच गंभीर नं होणं म्हणजे ब्रेडक्रम्बिंग.
घोस्टिंग (Ghosting) - अचानक गायब होणं!
यामध्ये समोरची व्यक्ती आज बोलतेय पण उद्या मेसेज बंद, कॉलला उत्तर नाही- हेच Ghosting! म्हणजे समोरची व्यक्ती एकदम संपर्क तोडते, कोणतंही कारण न सांगता. यामध्ये नातं तुटतं, पण उत्तर काहीच मिळत नाही.
Ghosting चं मवाळ रूप म्हणजे Caspering. म्हणजे बोलणं हळूहळू कमी करणं, मेसेजेसना उशिरा रिप्लाय करणं, आणि शेवटी शांतपणे गायब होणं. हा शब्द “कॅस्पर” या फ्रेंडली घोस्ट कार्टूनवरून आला आहे!
यामध्ये नातं संपलं, पण तरीही एक्स तुमच्या सगळ्या स्टोरीज पाहतो, फोटो लाईक करतो. हेच Orbiting! म्हणजे थेट बोलणं नाही, पण सोशल मीडियावरून दूरून नजर ठेवणं.
यामध्ये समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलते, पण तुम्हाला कधी भेटत नाही.. तुमच्या नात्याबद्दल किंवा तुम्ही तिच्यासाठी काय आहात ही ठोसपणे सांगत नाही, कारण तुम्ही त्यांच्या ‘बेंच’वर आहात! म्हणजे समोरची व्यक्ती तुम्हाला बॅकअप ऑप्शन म्हणून ठेवते, जोपर्यंत त्यांना दुसरं कोणी मिळत नाही.
टेक्स्टेशनशिप (Textationship) - फक्त मेसेजवरचं नातं
अनेकांचं प्रेम आता मेसेज, मीम्स आणि इमोजींपर्यंतच मर्यादित आहे. प्रत्यक्ष भेटच नाहीत. नातं फक्त फोनच्या स्क्रीनवर जगतं. हेच Textationship.
रोचिंग (Roaching) - सगळं सांगत नाहीत!
कधी तुम्हाला कळतं की समोरचा अजून काही लोकांना डेट करतोय, पण तुम्हाला सांगत नाही. हाच प्रकार Roaching म्हणून ओळखला जातो. म्हणजे रिलेशनशिपमध्ये पारदर्शकता नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती तुमचं नातं सगळ्यांपासून लपवते. मित्र, कुटुंब, सोशल मीडियावर काहीही दाखवत नाही, फोटो शेअर करत नाही, त्याला म्हणतात Stashing किंवा Pocketing.
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला Ghosting करते आणि काही महिन्यांनी अचानक “Hey, how are you?” असा मेसेज पाठवत पुन्हा तुमच्या आयुष्यात परतते, यालाच म्हणतात Zombieing.
अफोर्डेटिंग म्हणजे महागड्या रेस्टॉरंटऐवजी साध्या, मनाने जोडणाऱ्या डेट्स घेणं . जसं की कॉफी, वॉक, किंवा पार्कमध्ये वेळ घालवणं.
ग्रीन फ्लॅग म्हणजे तुमच्या नात्यात समजूतदारपणा, स्पष्ट संवाद, आदर, विश्वास असणं होय.. आशा व्यक्तीसोबतचं नातं नातं टिकणारं असतं. आणि याच्या अगदी उलटं म्हणजे रेड फ्लॅग होय.
लहान पण गोड गोष्टी जसं “take care” म्हणणं, कॉफी आणून देणं, किंवा हात धरून चालणं. हेच छोट्या गोष्टींमधलं मोठं प्रेम!
Gen Z चं प्रेम कदाचित डिजिटल आहे, पण भावना खऱ्या आहेत. हे शब्द फक्त मजेशीर नाहीत, तर आधुनिक नात्यांची वास्तवता दाखवतात. जिथे कमिटमेंटपेक्षा कनेक्शन आणि इमोजीपेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत.