चीज लव्हर्ससाठी परफेक्ट! एकदा नक्की ट्राय करा मॅक्रोनी हॉट पॉट

सर्वप्रथम मॅक्रोनी मऊ होईपर्यंत उकडून घ्या. मॅक्रोनी शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून ती बाजूला ठेवा.
चीज लव्हर्ससाठी परफेक्ट! एकदा नक्की ट्राय करा मॅक्रोनी हॉट पॉट
'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मॅक्रोनी खायला आवडत असेल आणि नेहमीची मॅक्रोनी खाऊन कंटाळा आला असेल, तर ही मॅक्रोनी हॉट पॉट रेसिपी नक्की ट्राय करा. मॅक्रोनीसोबत भाज्या, बेक्ड बीन्स आणि क्रीमी चीज सॉसचा स्वाद या पदार्थाला आणखी खास बनवतो. वरून वितळलेलं चीज आणि आतून क्रीमी मॅक्रोनी असा हा पदार्थ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी अगदी सोपी असून साधारण २०-२५ मिनिटांत तयार होते.

चीज लव्हर्ससाठी परफेक्ट! एकदा नक्की ट्राय करा मॅक्रोनी हॉट पॉट
रेस्टॉरंट स्टाईल गार्लिक राईस आता घरच्या घरी; 'या' सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी रेसिपी

साहित्य :

  • २ कप मॅक्रोनी

  • १ कप बेक्ड बीन्स

  • २ कप मोझरेला चीज

  • १ कप मिक्स भाज्या - शिमला मिरची, स्वीट कॉर्न आणि कांदा

  • १ कप दूध

  • २ टेबलस्पून बटर

  • २ टेबलस्पून मैदा

  • चवीनुसार मीठ

  • चवीनुसार काळी मिरी

  • मिक्स हर्ब्स

कृती :

सर्वप्रथम मॅक्रोनी मऊ होईपर्यंत उकडून घ्या. मॅक्रोनी शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून ती बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात मैदा घालून एक-दोन मिनिटे परतून घ्या. त्यानंतर हळूहळू दूध घालत सतत ढवळत राहा. सॉस घट्ट होऊन चमच्याच्या मागच्या बाजूला व्यवस्थित कोट होईल इतका शिजवा.

यानंतर गॅस मंद करा आणि त्यात मोझरेला चीज घाला. चीज पूर्णपणे वितळेपर्यंत सॉस ढवळून घ्या. तयार चीज सॉसमध्ये उकडलेली मॅक्रोनी आणि चिरलेल्या भाज्या घाला. सर्व साहित्य सॉसमध्ये व्यवस्थित एकजीव करा.

चीज लव्हर्ससाठी परफेक्ट! एकदा नक्की ट्राय करा मॅक्रोनी हॉट पॉट
रोजच्या भाजीला हटके ट्विस्ट! घरच्या घरी बनवा 'क्रीमी गार्लिक मशरूम-पालक'; वाचा रेसिपी

आता त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि मिक्स हर्ब्स घाला. दोन-तीन मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. तयार मिश्रण एका बेकिंग डिशमध्ये काढून त्यावर पुन्हा मोझरेला चीज पसरवा. ओव्हन आधीच १७५ अंश सेल्सिअसवर प्रीहीट करून घ्या. बेकिंग डिश ओव्हनमध्ये ठेवून साधारण १५ ते २० मिनिटे बेक करा. वरचं चीज वितळून त्याला हलका गोल्डन रंग आला की गरमागरम मॅक्रोनी हॉट पॉट तयार.

टिप्स :

  • मॅक्रोनी जास्त मऊ होईपर्यंत उकडू नका. बेक करताना ती आणखी शिजते.

  • भाज्यांमध्ये गाजर, मशरूम किंवा ब्रोकोलीचाही वापर करू शकता.

  • अधिक चीजाळ चव हवी असल्यास मोझरेला सोबत चेडर चीज वापरा.

  • दूध घालताना सॉस सतत ढवळल्यास गुठळ्या होणार नाहीत.

  • ओव्हनमधून बाहेर काढल्यानंतर दोन-तीन मिनिटे थांबून सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in