आज महाराष्ट्रात भक्तीभावाने माघी गणेश चतुर्थी साजरी होत आहे. या दिवशी विधीपूर्वक पूजा, तिळ-गुळाचा नैवेद्य आणि मनोभावे बाप्पाची आराधना केली जाते. माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हे मराठी शुभेच्छा संदेश आणि आकर्षक कार्डस् WhatsApp, Facebook आणि Instagram द्वारे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांना पाठवा, तसेच स्टेटसवर शेअर करून या सणाचा आनंद द्विगुणित करा.
विघ्नहर्ता गणराय सदैव तुमच्यावर कृपा ठेवो; माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
विघ्नहर्ता गणराय तुमच्या सर्व अडचणी दूर करो आणि जीवन आनंदाने भरून टाको; माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
आगमनाने विघ्नहर्त्याच्या सुखाची झाली सुरुवात, आनंदाने फुलले मन, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना; माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
बाप्पाच्या कृपेने संकटांवर मात होवो, प्रत्येक कार्यात यश लाभो, आणि जीवन आनंदाने फुलो; माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
तिळगुळासारखं गोड नातं, मोदकासारखं गोड आयुष्य आणि बाप्पाचा आशीर्वाद सदैव लाभो. माघी गणपतीच्या शुभेच्छा!
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपले जीवन अधिक सुखकर होवो माघी गणपतीच्या शुभेच्छा!