मालपोहे - सण, परंपरा आणि चव यांची गोड मेजवानी

भारतीय परंपरेत गोड पदार्थांना नेहमीच खास स्थान मिळालं आहे. त्यातही मालपोहे हा गोड पदार्थ सण-उत्सव, पूजा आणि कौटुंबिक समारंभात आवर्जून बनवला जातो.
मालपोहे - सण, परंपरा आणि चव यांची गोड मेजवानी
Published on

भारतीय परंपरेत गोड पदार्थांना नेहमीच खास स्थान मिळालं आहे. त्यातही मालपोहे हा गोड पदार्थ सण-उत्सव, पूजा आणि कौटुंबिक समारंभात आवर्जून बनवला जातो. पॅनकेकसारखा दिसणारा पण चवीनं पूर्ण वेगळा असलेला हा गोड पदार्थ महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, ओडिशा, बंगालपासून उत्तर भारतापर्यंत विविध ठिकाणी आपापल्या पद्धतीने बनवला जातो.

मालपोहे कसे बनवायचे?

  • पीठ तयार करणे - गव्हाचे पीठ, रवा, दूध, दही, वेलची पूड एकत्र करून काही तास आंबवले जाते.

  • हे पीठ जाडसर पॅनकेकसारखे तुपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळले जाते.

  • गरमागरम मालपोहे साखरेच्या पाकात काही मिनिटं भिजवले जातात.

  • वरून बदाम, काजू, पिस्ते किंवा खोबऱ्याचा किस घालून मालपोहे सर्व्ह केले जातात.

आरोग्यदायी फायदे

  • मालपोहे हा गोड पदार्थ असला तरी काही प्रमाणात खाल्ले तर ते चांगले पोषक घटकही देतात.

  • रवा आणि पीठामुळे कार्बोहायड्रेट्स मिळतात.

  • दुधामुळे कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते.

  • साखरेमुळे तत्काळ उर्जा मिळते आणि सणांचा उत्साह वाढतो.

लाइफस्टाईलमध्ये स्थान

आजच्या फास्टफूडच्या युगातसुद्धा मालपोहे आपलं वेगळं स्थान टिकवून आहेत. होममेड डिश म्हणून आजही महिलांना हा पदार्थ बनवायला आवडतो. रेस्टॉरंट्स आणि स्वीट शॉप्समध्ये राजस्थानी मालपुवा, मावा मालपुवा किंवा रबडीसोबतचा मालपुवा खास डिश म्हणून उपलब्ध होतो. आधुनिक काळात लोक हेल्दी ट्विस्टसाठी साखरेऐवजी गुळाची पाक किंवा कमी तुपाचा वापर करू लागले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in