

मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या अस्मितेची, संस्कृतीची आणि परंपरेची ओळख आहे. संत, साहित्यिक आणि विचारवंतांनी समृद्ध केलेली मराठी भाषा आजही तितक्याच अभिमानाने जगभरात बोलली जाते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा ट्रेंड वाढला आहे. WhatsApp, Instagram, Facebook यांसारख्या प्लॅटफॉर्मवर मराठीतील सुंदर संदेश, स्टेटस, Greeting Cards आणि पोस्ट शेअर करून अनेकजण आपल्या भाषेचा अभिमान व्यक्त करत आहेत. तुम्हीही या खास दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबीयांना आणि प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून मराठी भाषेचा गौरव करू शकता.
१. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जपू या आपण सर्वजण आपली मायबोली मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
२. मराठी ही केवळ भाषा नाही,
ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
३. मराठीचा अभिमान आहे,
मराठीची शान आहे,
आपली मायबोली हीच आपली ओळख आहे
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
४. संतांची, साहित्यिकांची समृद्ध परंपरा लाभलेली,
अशी आपली मराठी भाषा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
५. जपू या, वाढवू या आणि अभिमानाने बोलूया मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
६. मायबोली मराठी हीच आपली खरी ओळख,
तिचा अभिमान बाळगूया सदैव
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
७. जग बदलले तरी
आपली भाषा आणि संस्कृती कायम जपूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
८. मराठी आहे आपली शान,
मराठी आहे आपला अभिमान
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!