

सकाळच्या घाईगडबडीत मुलांना काय खाऊ द्यावं हा नेहमीच आईंच्या डोक्याला ताप असतो. रोज तेच पोहे, उपमा किंवा शिरा देऊन मुलं कंटाळतात आणि बाहेरचं खायला हट्ट धरतात. पण आता घरच्या घरीच काहीतरी टेस्टी आणि झटपट बनवता येईल, तो म्हणजे चमचमीत मसाला टिक्की पाव!
पाव
उकडलेला बटाटा
पनीर
बारीक शेव
आलं-लसूण पेस्ट
हिरवी मिरची
कढीपत्ता
कोथिंबीर
लाल तिखट, जिरे पावडर, हळद, गरम मसाला
कांदा, टोमॅटो
बटर
मीठ चवीनुसार
कढईत थोडं तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि आलं-लसूण पेस्ट टाका. मग मॅश केलेला बटाटा आणि पनीर घालून मिक्स करा. त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला घालून परतून घ्या. शेवटी कोथिंबीर टाका आणि टिक्की तयार ठेवा.
वेगळ्या भांड्यात लसूण, जिरे, लाल तिखट आणि हिरवी मिरची वाटून पेस्ट करा. ती पेस्ट थोड्या तेलावर भाजा आणि त्यावर टिक्क्या दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
पावमध्ये या टिक्क्या ठेवा, वर मसाला पेस्ट आणि शेव टाका. दोन्ही बाजूंनी थोडं बटर लावून भाजा आणि सर्व्ह करा.
फक्त काही मिनिटांत तयार होणारा हा चमचमीत मसाला टिक्की पाव मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट पर्याय ठरेल!