Monsoon Tips : पावसाळ्यात घामाच्या दुर्गंधीला ‘रामराम’! घरगुती उपायांनी मिळवा दिवसभर ताजेपणा

पावसाळा म्हणजे आर्द्रतेची साथ आणि त्याच्यासोबत येणाऱ्या अनेक तक्रारी, जसे की त्वचेचा चिकटपणा, खाज सुटणे आणि विशेषतः घामाच्या वासाचा त्रास. या काळात केवळ साबणाने अंघोळ करणे पुरेसे राहत नाही. तरीही महागडे प्रॉडक्ट वापरायची गरज नाही, कारण घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही या समस्यांवर सहज मात करू शकता.
Monsoon Tips : पावसाळ्यात घामाच्या दुर्गंधीला ‘रामराम’! घरगुती उपायांनी मिळवा दिवसभर ताजेपणा
Published on

पावसाळा म्हणजे आर्द्रतेची साथ आणि त्याच्यासोबत येणाऱ्या अनेक तक्रारी, जसे की त्वचेचा चिकटपणा, खाज सुटणे आणि विशेषतः घामाच्या वासाचा त्रास. या काळात केवळ साबणाने अंघोळ करणे पुरेसे राहत नाही. तरीही महागडे प्रॉडक्ट वापरायची गरज नाही, कारण घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही या समस्यांवर सहज मात करू शकता.

तुमच्या अंघोळीच्या पाण्यात तुरटी थोडीशी बारीक करून मिसळा; यामुळे खाज आणि दुर्गंधी दूर होते. कडुलिंबाची पाने उकळून त्याचा वापर अंघोळीच्या पाण्यात केल्यास हे नैसर्गिक बॅक्टेरिया नाशक म्हणून काम करते आणि त्वचा ताजी राहते.

याशिवाय, लेमनग्रास किंवा निलगिरी तेलाचे दोन-दोन थेंब अंघोळीच्या पाण्यात टाकल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि बॅक्टेरियांची वाढ थांबते. हे घरगुती घटक घाम आणि वास याला दूर ठेवतात आणि दिवसभर ताजेपणा देतात.

या साध्या, पण प्रभावी उपायांनी तुम्ही पावसाळ्यातील आर्द्रतेचा त्रास टाळू शकता, तोही कोणत्याही महागड्या स्किनकेअर प्रॉडक्टशिवाय. त्यामुळे यंदा पावसाळा येताच ताजेतवाने आणि स्वच्छ राहण्यासाठी या घरगुती टिप्स नक्की वापरून पाहा.

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in