सकाळचा नाश्ता टाळता? अशा सवयींमुळे ब्लॉक होतात रक्तवाहिन्या, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

जगभरात हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण चिंताजनक पातळीवर गेलं आहे. विशेष म्हणजे, हार्ट अटॅक येण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच शरीर संकेत देतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सततचा थकवा, श्वास घेताना त्रास, छातीत जडपणा, हातात वेदना ही काही सुरुवातीची लक्षणं आहेत.
सकाळ नाश्ता टाळता? मग वाचा हे! अशा सवयींमुळे ब्लॉक होतात रक्तवाहिन्या, वाढतो हार्ट अटॅकचा धोका
सकाळ नाश्ता टाळता? मग वाचा हे! अशा सवयींमुळे ब्लॉक होतात रक्तवाहिन्या, वाढतो हार्ट अटॅकचा धोका
Published on

आपल्या दैनंदिन आयुष्यातील सकाळची वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतांश लोक या वेळेत स्वतःकडे लक्ष देणं विसरतात. उठल्याबरोबर मोबाईल हातात घेणं, पाणी न पिणं, नाश्ता टाळणं अशा छोट्या पण चुकीच्या सवयी दीर्घकाळात गंभीर आजारांना निमंत्रण देतात. त्यातलीच एक मोठी समस्या म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

जगभरात हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण चिंताजनक पातळीवर गेलं आहे. विशेष म्हणजे, हार्ट अटॅक येण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच शरीर संकेत देतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सततचा थकवा, श्वास घेताना त्रास, छातीत जडपणा, हातात वेदना ही काही सुरुवातीची लक्षणं आहेत.

सकाळच्या चुकीच्या सवयी ज्यामुळे धोका वाढतो

  • नाश्ता न करणं

  • उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेणं

  • पाणी न पिणं

  • रात्री उशिरा जेवण आणि सकाळी उशिरा उठणं

या सवयींमुळे शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो, आणि ‘कोर्टिसोल’ स्ट्रेस हार्मोन वाढतो, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो.

रक्तवाहिन्या ब्लॉक का होतात?

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होतो.

हा प्लेक म्हणजे कोलेस्ट्रॉलचा पिवळा थर, जो रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतो.

त्यामुळे हृदयाला पुरेसं ऑक्सिजन पोहोचत नाही, आणि हळूहळू ब्लॉकेज तयार होतं.

हीच स्थिती हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या जीवघेण्या परिस्थितीला कारणीभूत ठरते.

सकाळ नाश्ता टाळता? मग वाचा हे! अशा सवयींमुळे ब्लॉक होतात रक्तवाहिन्या, वाढतो हार्ट अटॅकचा धोका
डायबिटीज असणाऱ्यांनी लक्ष द्या! ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान; वाचा कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायद्याचे

नाश्ता का आवश्यक आहे?

रात्रभर शरीर अन्नाशिवाय असतं, त्यामुळे सकाळी मेटाबॉलिझम पुन्हा सुरू करायला इंधन लागतं.

सकाळचा पोटभर नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, साखरेचं प्रमाण स्थिर राहतं आणि इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारते.

नाश्ता न केल्याने मात्र ताण वाढतो, रक्तदाब वाढतो आणि टाईप २ मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

काय टाळायला हवं?

  • अतितिखट, तेलकट आणि गोड पदार्थांचं सेवन

  • वारंवार उपाशी राहणं

  • व्यायाम न करणं

  • झोपेचं अपुरं प्रमाण

काय करायला हवं?

  • सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या

  • दररोज ३० मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करा

  • वेळेवर आणि संतुलित नाश्ता घ्या

  • फळं, ओट्स, ड्रायफ्रूट्स, आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

सकाळच्या सवयींमध्ये थोडा बदल केल्यास तुम्ही रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. शरीर आपल्याला वेळोवेळी संकेत देतं, फक्त त्यांना ऐकायचं आणि वेळीच पाऊल उचलायचं. कारण एक सवय बदलली, तर आयुष्य वाचू शकतं.

(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in