सध्या धकाधकीचं जीवन, जंक फूडचं सेवन, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे अनेकांना वजन वाढीची समस्या जाणवते. वजन कमी करण्यासाठी बरेचजण विविध उपाय करताना दिसतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार चालणं हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम असून नियमित काही किलोमीटर चालल्याने वजन कमी होण्यास मदत होते. काहीजण आपापल्यावेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर चालण्यासाठी जातात. मात्र नक्की कोणत्या वेळी चालल्याने वजन लवकर कमी होतं याविषयी जाणून घेऊयात.
सकाळी चालण्याचे फायदे :
1. सकाळी रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्याने मेटाबॉलिज्म वाढतं. यामुळे तुम्ही दिवसभरात जास्त कॅलरीज बर्न करता.
2. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि ताज्या हवेत चालल्याने तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटते.
3. सकाळची वेळ ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी सर्वात चांगली समजली जाते.
4. सकाळी चालल्याने पचनक्रिया उत्तम राहण्यास मदत मिळते.
संध्याकाळी चालण्याचे फायदे :
1. दिवसभर कामासाठी धावपळ केल्यावर संध्याकाळी मोकळ्या हवेत चालल्याने तणाव दूर होतो.
2. संध्याकाळी चालल्याने झोपेची गुणवत्ता वाढते आणि चांगली झोप मिळते.
3. दिवसभर काम केल्यावर चालण्याचा व्यायाम केल्याने मसल्स रिलॅक्स होण्यास मदत होते.
4. संध्याकाळी चालल्याने सुद्धा वजन कमी करता येते.
कोणत्या वेळी चालल्याने वजन लवकर कमी होतं?
सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा चालण्याच्या व्यायामासाठी उत्तम आहेत. मात्र जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर सकाळी व्यायाम करणं जास्त फायदेशीर ठरतं. कारण सकाळी रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्याने मेटाबॉलिज्म वाढत तसेच कॅलरीज लवकर बर्न होतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)