चेहऱ्यापुरतीच नव्हे, तर केसांसाठीही आहे 'ही' नैसर्गिक देणगी! हेअर मास्क कसा बनवायचा, तेही जाणून घ्या
मुलतानी मातीचा वापर अनेकजण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी करतात. पण, हीच माती केसांसाठीही तितकीच उपयोगी ठरू शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मुलतानी मातीच्या नियमित वापराने केस मजबूत, जाड व लांब होतात. त्यासाठी घरच्या घरी हेअर मास्क कसा तयार करायचा, याची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
तेलकट केसांसाठी हेअर मास्क
दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा दही आणि एक लहान चमचा लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.
कोरडे आणि निर्जीव केसांसाठी
दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा दही आणि एक चमचा मध मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना आणि टाळूवर लावून २० मिनिटांनी धुवा.
केस गळतीवर उपाय
केस जास्त गळत असतील तर दोन चमचे मुलतानी माती, दोन चमचे मेथी पावडर आणि एक चमचा दही एकत्र करा. हे मिश्रण अर्धा तास केसांवर ठेवून मग धुवा.
केस वाढवण्यासाठी हेअर मास्क
दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून पेस्ट करा. ही पेस्ट ३० मिनिटे टाळूवर व केसांवर ठेवून नंतर शॅंपूने धुवा.
फायदे काय?
मुलतानी माती हेअर मास्कमुळे केस मजबूत, मऊ आणि चमकदार होतात. टाळूवरील खाज, कोंडा होणे या सारख्या समस्यांवर आराम मिळतो आणि केस गळती कमी होते. यासोबतच केस वाढण्याचा वेगही वाढतो. मात्र, वापरापूर्वी त्वचेवर ‘पॅच टेस्ट’ करून खात्री करा की ही माती तुमच्या त्वचेला सूट होतेय का? आणि मगच वापरा आणि फरक अनुभवा.
(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)