Nag Panchmi 2024 : नागपंचमीनिमित्त बनवा खास हळदीच्या पानातील पातोळ्या, फॉलो करा सोपी रेसिपी

नागपंचमीच्या निमित्ताने पातोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात
Haldichya Panatil Patoli Recipe
हळदीच्या पानातील पातोळ्याCanva
Published on

९ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये हळदीच्या पानातील पातोळ्या बनवल्या जातात. पातोळ्या या फारचं चविष्ट लागतात. तेव्हा नागपंचमीच्या निमित्ताने पातोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

पातोळ्या तयार करण्यासाठी सामग्री :

एक कप तांदळाचे पीठ

१५ हळदीची पान

चिमूठभर मीठ

अर्धा कप किसलेला गूळ

चिमूटभर वेलची पूड

एक कप किसलेले खोबरे

तूप

पातोळ्या तयार करण्यासाठी रेसिपी :

एका कढईत तूप गरम करत ठेवा. मग तुपात किसलेला गूळ वितळून घ्यावे. वितळलेल्या गुळात किसलेलं खोबरं घालून परतवून घ्या यात चवीनुसार वेलची पूड घाला. अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून सारण तयार होते. सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करून त्यात समप्रमाणात तांदळाचे पीठ टाकून त्याची उकड तयार करून घ्यावे.

Haldichya Panatil Patoli Recipe
Nag Panchami 2024: ९ की १० ऑगस्ट? कधी आहे नागपंचमी? जाणून घ्या योग्य तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त

मग ही उकड एका परातीत नीट मळून घ्यावी आणि या पिठाचे गोळे हळदीच्या पानावर थापून घ्यावेत. थापलेल्या पिठात सारण भरून मग मध्यभागातून पान दुमडून घ्यावे. सारण भरल्यावर सर्व बाजुंनी पातोळीच्या कडा नीट बंद होतील याकडे नीट लक्ष द्या. तयार झालेल्या पातोळ्या पाण्याच्या वाफेवर शिजत ठेवा. किमान १५ ते २० मिनिटे या पातोळ्या शिजवा. अशा प्रकारे गरमागरम आणि चविष्ट हळदीच्या पानातील पातोळ्या तयार होतात.

logo
marathi.freepressjournal.in