
सोशल मीडियावर नवनवीन एआय ट्रेंड सतत येत असतात. काही दिवसांपूर्वी ‘घिब्ली स्टाईल’ने धुमाकूळ घातला होता, आणि आता त्याची जागा घेतली आहे एक भन्नाट ट्रेंडने -‘नॅनो बनाना’ (Nano Banana).
काय आहे ‘नॅनो बनाना’ ट्रेंड?
हा ट्रेंड म्हणजे साध्या फोटोला काही सेकंदांत आकर्षक 3D पुतळ्यात बदलणारे गुगलचे एआय टूल. खरं तर, ‘नॅनो बनाना’ हे गुगलच्या जेमिनी २.५ फ्लॅश इमेज एडिटिंग टूलचे कोडनेम आहे. हे टूल थेट गुगल जेमिनी ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहे.
यात तुम्ही तुमचा फोटो अपलोड करून योग्य प्रॉम्प्ट (सूचना) दिली की लगेचच एक सुंदर 3D पुतळा तयार होतो. सगळ्यात खास म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत आहे! गुगलने काही तयार प्रॉम्प्ट्स दिलेले असल्यामुळे नवख्या युजर्सनाही हा ट्रेंड सहज वापरता येतो.
3D पुतळा कसा तयार कराल?
गुगल जेमिनी ॲप किंवा AI स्टुडिओ वेबसाइट उघडा.
तुमचा फोटो अपलोड करा.
हवा असलेला प्रॉम्प्ट टाका. (किंवा गुगलने दिलेले अधिकृत प्रॉम्प्ट वापरा)
‘Run’ वर क्लिक करा, आणि काही सेकंदांत तयार!
‘नॅनो बनाना’ ट्रेंडसाठी आवश्यक प्रॉम्प्ट
"Create a 1/7 scale commercialized figurine of the characters in the picture, in a realistic style, in a real environment. The figurine is placed on a computer desk. The figurine has a round transparent acrylic base, with no text on the base. The content on the computer screen is a 3D modeling process of this figurine..."
या टूलची मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही फोटोला केवळ 3D पुतळाच नाही तर १६-बिट व्हिडिओ गेम कॅरेक्टरमध्येही बदलू शकता.
सेलिब्रिटींपासून ते नेत्यांपर्यंत सगळेजण हा ट्रेंड वापरत असल्यामुळे ‘नॅनो बनाना’ आता भारतातही जोरदार व्हायरल होत आहे.