
उन्हाळा सुरू झाला की त्वचेची काळजी वाटते. कडक उन्हामुळे त्वचा काळवंडणे, जळजळणे, त्वचा लाल पडणे असे त्रास संभवतात. यासाठी अनेकजण सनस्क्रीन वापरतात. मात्र, ज्यांची त्वचा खूपच संवेदनशील असते त्यांना सनस्क्रीनमधील रासायनिक घटकांमुळे देखील त्रास होतो. सनस्क्रीनचे त्वचेवर विविध साईड इफेक्ट होत असल्याचे काही अभ्यासांमध्ये आढळले आहे. त्यामुळे अनेकजण सनस्क्रीनसाठी नैसर्गिक पर्याय काय आहेत याचा विचार करत आहेत. जाणून घेऊया सनस्क्रीनला कोणकोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते सनस्क्रीनला थेट पर्याय नसला तरी काही गोष्टी सनस्क्रीनला रिप्लेस करू शकतात. यामध्ये मुख्यत्वे करून वेगवेगळे तेल आहे.
खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल आणि शिया बटर
तज्ज्ञांच्या मते खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल आणि शिया बटर यांचा SPF 2-8 असतो. त्यामुळे हे तेल काही प्रमाणात सूर्य किरणांच्या अतिनील किरणांपासून थोडे संरक्षण देऊ शकतात.
हे ही वाचा -
कोरफड जेल
कोरफड ही त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. कोरफडचा गर थंड असतो. अनेक त्वचाविकारांमध्ये ती उपयुक्त असते. त्यामुळे कोरफडपासून बनवले जाणारे जेल हे ऊन्हापासून तुमचा बचाव करू शकतात.
संरक्षक पोशाख (wearing UPF clothing)
सूर्याच्या अतिनिल किरणांपासून वाचण्यासाठी शक्यतो कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे. मात्र, ते शक्य नसेल तर ऊन्हात बाहेर पडताना संरक्षक कपडे वापरावे. पांढरा रंग हा सूर्याच्या किरणांना परावर्तीत करतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे किंवा लाइट रंगाचे कपडे घालणे. याशिवाय चेहऱ्याला स्कार्फ बांधून बाहेर पडणे. त्वचेच्या संरक्षणासाठी सनकोट, पांढऱ्या रंगाचे किंवा लाइट रंगाचे पूर्ण हँडग्लॉव्ज वापरावे. जेणेकरून त्वचेवर थेट ऊन पडणार नाही. याशिवाय छत्रीचा वापर करावा. यामुळे त्वचा सुरक्षित राहू शकते.