वॅक्सिंगचा त्रास टाळा! घरच्या घरी करा नैसर्गिक हेअर रिमूव्हल; १० मिनिटांत मिळवा मऊ त्वचा

वॅक्सिंगच्या वेदनेशिवाय हाता-पायावरील केस कसे काढायचे? जाणून घ्या ३ सोपे घरगुती उपाय जे १० मिनिटांत देतात पार्लरसारखी मऊ, स्वच्छ त्वचा. नैसर्गिक घटकांसह सुरक्षित आणि प्रभावी हेअर रिमूव्हल टिप्स.
वॅक्सिंगचा त्रास टाळा! घरच्या घरी करा नैसर्गिक हेअर रिमूव्हल; १० मिनिटांत मिळवा मऊ त्वचा
वॅक्सिंगचा त्रास टाळा! घरच्या घरी करा नैसर्गिक हेअर रिमूव्हल; १० मिनिटांत मिळवा मऊ त्वचा
Published on

नको असलेल्या केसांमुळे त्वचेचं सौंदर्य कमी होतं, म्हणून अनेकजण वॅक्सिंग किंवा रेझरचा वापर करतात. मात्र वॅक्सिंगची वेदना आणि रेझरमुळे होणारा कोरडेपणा अनेकांना त्रासदायक ठरतो. अशा वेळी घरच्या घरी, नैसर्गिक घटकांचा वापर करून केस काढण्याचे सोपे उपाय उपयोगी ठरू शकतात. हे उपाय केवळ केस काढत नाहीत, तर त्वचेला मऊ, स्वच्छ आणि उजळ बनवण्यासही मदत करतात.

घरगुती उपाय का ठरतात फायदेशीर?
स्वयंपाकघरातील घटकांमध्ये केमिकल्स नसतात, त्यामुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता कमी असते. नियमित वापर केल्यास केसांची वाढ कमी होते आणि त्वचा अधिक काळ क्लीन राहते.

१. बेसन आणि हळदीचा लेप

बेसन त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, तर हळद अँटीसेप्टिक म्हणून काम करते.
२ चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि थोडं दूध किंवा पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट हाता-पायांवर लावून १०-१५ मिनिटांनी सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढा. यामुळे बारीक केस निघण्यास मदत होते.

वॅक्सिंगचा त्रास टाळा! घरच्या घरी करा नैसर्गिक हेअर रिमूव्हल; १० मिनिटांत मिळवा मऊ त्वचा
उन्हात फिरून पाय काळवंडले? घरच्या घरी करा हा सोपा उपाय; कमी खर्चात मिळेल स्वच्छ आणि मऊ त्वचा

२. मसूर डाळ स्क्रब

मसूर डाळ त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते. यामुळे केस काढण्यासोबत टॅनिंगही कमी होते.
रात्रभर दुधात भिजवलेली मसूर डाळ सकाळी जाडसर वाटून घ्या. त्यात थोडं मध मिसळा. ही पेस्ट त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

३. साखर आणि लिंबाचा नैसर्गिक वॅक्स

साखर आणि लिंबाचा वापर करून घरच्या घरी वॅक्सिंगसारखा परिणाम मिळवता येतो.
२ चमचे साखर, १ चमचा लिंबाचा रस आणि थोडं पाणी गरम करून चिकट मिश्रण तयार करा. हे मिश्रण कोमट असताना त्वचेवर लावा, त्यावर कापड ठेवून केसांच्या उलट दिशेने ओढा. केस मुळापासून निघतात.

वॅक्सिंगचा त्रास टाळा! घरच्या घरी करा नैसर्गिक हेअर रिमूव्हल; १० मिनिटांत मिळवा मऊ त्वचा
त्वचेवरील टॅनिंग कमी करा! १० रुपयांच्या बीटाने मिळवा नैसर्गिक गुलाबी ग्लो

लक्षात ठेवा

  • हे उपाय नियमित केल्यास अधिक चांगला परिणाम दिसतो

  • त्वचेवर काही त्रास वाटल्यास लगेच वापर थांबवा

  • संवेदनशील त्वचेसाठी आधी पॅच टेस्ट करणे आवश्यक

घरच्या घरी, सोप्या पद्धतीने आणि कोणत्याही वेदनेशिवाय केस काढण्याचे हे उपाय वापरून तुम्ही सहजच पार्लरसारखी स्वच्छ आणि मऊ त्वचा मिळवू शकता.

logo
marathi.freepressjournal.in