पान-गुलकंदाचा स्वाद अन् मोदकाची गोडी; नक्की ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी

पानाचा ताजेपणा, गुलकंदाची गोड चव आणि ड्रायफ्रूट्सचा स्वाद यामुळे हा मोदक चवीला तर खास आहेच, शिवाय दिसायलाही आकर्षक आहे.
पान-गुलकंदाचा स्वाद अन् मोदकाची गोडी; नक्की ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी
पान-गुलकंदाचा स्वाद अन् मोदकाची गोडी; नक्की ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा चॉकलेट मोदक असे अनेक प्रकार आपण बनवतो. मात्र यंदा मोदकाला थोडा हटके ट्विस्ट द्यायचा असेल, तर पान-गुलकंद मोदक नक्की ट्राय करा. पानाचा ताजेपणा, गुलकंदाची गोड चव आणि ड्रायफ्रूट्सचा स्वाद यामुळे हा मोदक चवीला तर खास आहेच, शिवाय दिसायलाही आकर्षक आहे. अवघ्या २५ मिनिटांत तयार होणारी ही सोपी रेसिपी पाहुण्यांसाठीही उत्तम पर्याय ठरू शकते.

साहित्य :

मोदकासाठी

  • १ कप डेसिकेटेड नारळ

  • अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क

  • ४ विड्याची पाने

  • १ टेबलस्पून तूप

  • २ टेबलस्पून टुटी फ्रुटी

  • अर्धा टीस्पून बडीशेप पावडर

पान-गुलकंदाचा स्वाद अन् मोदकाची गोडी; नक्की ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी
भजी-पकोड्यांना द्या सुट्टी! यावेळी ट्राय करा खमंग क्रिस्पी फ्राईड फ्लॉवर

स्टफिंगसाठी

  • ४ ते ५ टीस्पून गुलकंद

  • १ टेबलस्पून ड्रायफ्रूट्स पावडर

  • अर्धा टीस्पून बडीशेप पावडर

  • २ टेबलस्पून टुटी फ्रुटी

कृती :

१. पानाचे मिश्रण तयार करा - २ विड्याची पाने बारीक चिरून घ्या. ती कंडेन्स्ड मिल्कसोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. उरलेली पानेही बारीक चिरून मिश्रणात घाला.

२. नारळ भाजून घ्या - कढईत तूप गरम करा. त्यात डेसिकेटेड नारळ घालून मंद आचेवर २ ते ३ मिनिटे सतत ढवळत भाजून घ्या.

३. पानाचे मिश्रण मिसळा - आता भाजलेल्या नारळात पान-कंडेन्स्ड मिल्कचे मिश्रण घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा.

४. मिश्रण घट्ट होऊ द्या - मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. त्यानंतर गॅस बंद करा आणि ते थोडे थंड होऊ द्या.

पान-गुलकंदाचा स्वाद अन् मोदकाची गोडी; नक्की ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी
बटाट्याला द्या नवा ट्विस्ट! झटपट तयार करा खमंग 'आलू कुरकुरे'

५. गुलकंदाचे स्टफिंग तयार करा - एका भांड्यात गुलकंद, ड्रायफ्रूट्स पावडर, बडीशेप पावडर आणि टुटी फ्रुटी घालून चांगले मिसळा.

६. मोदकाचा आकार द्या - हाताला थोडे तूप लावून पानाच्या मिश्रणाचा छोटा गोळा घ्या. तो मोदकाच्या साच्यात ठेवा आणि मधोमध गुलकंदाचे स्टफिंग भरा.

७. साच्यात व्यवस्थित दाबा - वरून पुन्हा पानाचे मिश्रण लावून साचा हलक्या हाताने दाबा. त्यानंतर साचा उघडून मोदक अलगद बाहेर काढा.

८. सर्व्ह करा - सर्व मिश्रण संपेपर्यंत याच पद्धतीने मोदक तयार करा. तयार पान-गुलकंद मोदक सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवा आणि आनंद घ्या.

पान-गुलकंदाचा स्वाद अन् मोदकाची गोडी; नक्की ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी
नेहमीच्या कारल्याला द्या नवा ट्विस्ट; कमी तेलात बनवा हेल्दी टिक्की, मुलंही आवडीने खातील

पान-गुलकंद मोदकासाठी खास टिप्स :

  • पाने ताजी आणि हिरवी वापरल्यास मोदकाला छान सुगंध येतो.

  • नारळ भाजताना आच मंद ठेवा, नारळाचा रंग बदलू देऊ नका.

  • मिश्रण खूप गरम असताना मोदकाच्या साच्यात भरू नका.

  • गुलकंद आधीच गोड असल्याने अतिरिक्त साखर घालण्याची गरज नाही.

  • स्टफिंगमध्ये बदाम, काजू किंवा पिस्त्याची पावडर घातल्यास चव आणखी खुलते.

  • मोदक साच्यातून सहज बाहेर यावा यासाठी साच्याला अगदी हलका तुपाचा हात लावू शकता.

  • हिरवा रंग नैसर्गिक ठेवायचा असल्यास फूड कलर टाळून पानांचे प्रमाण थोडे वाढवू शकता.

logo
marathi.freepressjournal.in