Home Gardening Tips : पपई खाल्ली की सालं फेकता? थांबा! त्याच सालांपासून तयार करा रोपांसाठी नैसर्गिक खत

पपई खाल्ली की सालं फेकता? थांबा! त्याच सालांपासून घरच्या घरी तयार करा रोपांसाठी नैसर्गिक खत. हा सोपा उपाय वापरला तर झाडांची वाढ सुधारते. महागडी खतं न वापरता, किचनमधल्या उरलेल्या सालांचा उपयोग करून तुमची बाग हिरवीगार करा.
Home Gardening Tips : पपई खाल्ली की सालं फेकता? थांबा! त्याच सालांपासून तयार करा रोपांसाठी नैसर्गिक खत
Published on

आपण पपई खातो… आणि तिची सालं सरळ कचर्‍यात फेकतो. पण हीच सालं तुमच्या कुंडीतल्या रोपांसाठी जबरदस्त टॉनिक ठरू शकतात, हे फार कमी लोकांना माहिती असतं. अगदी घरच्या घरी, कोणताही खर्च न करता तयार होणारं हे नैसर्गिक खत तुमच्या झाडांची वाढ वाढवतं आणि फुलंही भरपूर येण्यास मदत करतं.

आजकाल घरातल्या रोपांना पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे झाडं खुंटतात, पानं पिवळी पडतात आणि फुलं येणं कमी होतं. अशावेळी महागडी खतं वापरण्यापेक्षा स्वयंपाकघरातल्या उरलेल्या पपईच्या सालांचा उपयोग करून तुम्ही सोपा आणि प्रभावी उपाय करू शकता.

Home Gardening Tips : पपई खाल्ली की सालं फेकता? थांबा! त्याच सालांपासून तयार करा रोपांसाठी नैसर्गिक खत
Home Gardening Tips : महागडं खत नकोच! स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांनी कुंडीतली रोपं राहतील टवटवीत

घरच्या घरी तयार करा नैसर्गिक खत
मध्यम आकाराच्या पपईची सालं बारीक कापून घ्या. ती साधारण दीड लिटर पाण्यात भिजत ठेवा. त्यात ५० ते ६० ग्रॅम गूळ घालून हे मिश्रण झाकून २४ तास उन्हात ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या.. तुमचं नैसर्गिक खत तयार!

झाडांसाठी इतकं फायदेशीर का?
या पाण्यातून झाडांना पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक मिळतात. त्यामुळे मातीचा कस सुधारतो, झाडं अधिक मजबूत होतात आणि फुलझाडांवर फुलांची संख्या वाढते.

कधी आणि कसं वापराल?
जर तुमच्या कुंडीतली रोपं नीट वाढत नसतील किंवा फुलं कमी येत असतील, तर आठवड्यातून एकदा हे पाणी झाडांना द्या. काही दिवसांतच फरक दिसायला लागेल.

शेवटी एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा…

Home Gardening Tips : पपई खाल्ली की सालं फेकता? थांबा! त्याच सालांपासून तयार करा रोपांसाठी नैसर्गिक खत
नारळाच्या शेंड्या कचऱ्यात टाकता? थांबा! त्याचे हे भन्नाट उपयोग तुम्हाला कदाचित माहित नसतील

स्वयंपाकघरातील कचरा म्हणून आपण जी सालं टाकतो, तीच तुमच्या बागेसाठी अमूल्य ठरू शकतात. थोडी सर्जनशीलता वापरली, तर कचरा कमी होईल आणि तुमची बागही हिरवीगार फुलेल!

logo
marathi.freepressjournal.in