दररोज मानेवर परफ्यूम-डिओ मारताय? सावध रहा! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

मानेवर आणि काखेत परफ्यूम-डिओ लावणं ही आजकाल सवयच बनली आहे. ऑफिसला निघताना, कॉलेजला जाताना किंवा कुठेही बाहेर जायचं असलं की 'फ्रेश' वाटण्यासाठी एक-दोन स्प्रे हमखास मारले जातात. पण हीच रोजची सवय हळूहळू शरीरासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
दररोज मानेवर परफ्यूम-डिओ मारताय? सावध रहा! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा
दररोज मानेवर परफ्यूम-डिओ मारताय? सावध रहा! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा
Published on

याबाबत फर्टिलिटी आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. क्रिस्टाबेल अकिनोला (Dr. Christabel Akinola) यांनी स्पष्ट केलं आहे की, मानेवर आणि काखेत थेट परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर केल्याने हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

मानेवर परफ्यूम लावणं का धोकादायक?

डॉ. अकिनोला यांच्या मते, मानेची त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा खूपच पातळ आणि संवेदनशील असते. या भागात रक्तवाहिन्या अधिक असल्यामुळे इथे लावलेली रसायने लवकर शरीरात शोषली जातात. विशेष म्हणजे, याच भागाखाली थायरॉइड ग्रंथी असते.

थायरॉइड ग्रंथी शरीरातील वजन, ऊर्जा पातळी, मूड, हृदयाची गती, मासिक पाळी आणि फर्टिलिटी यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे मानेवर रोज परफ्यूम–डिओ लावल्यास या ग्रंथीच्या कामावर परिणाम होण्याचा धोका वाढतो.

दररोज मानेवर परफ्यूम-डिओ मारताय? सावध रहा! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा
वेळ वाचवण्याच्या नादात फ्रीजमधील शिळ्या कणिकेच्या पोळ्या खाताय? मग 'ही' माहिती नक्की वाचा

परफ्यूममधील केमिकल्स काय नुकसान करतात?

डॉक्टर सांगतात की अनेक परफ्यूम आणि डिओड्रंटमध्ये एंडोक्राइन डिसरप्टर्स नावाची रसायने असतात. ही रसायने शरीरातील हार्मोन्सच्या नैसर्गिक संतुलनात अडथळा आणतात.

यामुळे पुढे जाऊन

  • कारण नसताना वजन वाढणं किंवा घटणं

  • सतत थकवा जाणवणं

  • हार्मोन्सचा समतोल बिघडणं

  • फर्टिलिटीशी संबंधित समस्या

  • गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत वाढण्याचा धोका

अशा त्रासांना सामोरं जावं लागू शकतं.

काखेत डिओ लावणं महिलांसाठी जास्त धोक्याचं का?

काखेत घाम जास्त येतो म्हणून अनेक जण इथे मोठ्या प्रमाणात डिओड्रंट वापरतात. मात्र काख हा भाग स्तनांच्या खूप जवळ असतो. काही अभ्यासांनुसार, या भागात केमिकल्सचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास ब्रेस्ट टिश्यूवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.

तसंच, काखेजवळ असलेल्या लिम्फ नोड्सवर परिणाम झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच डॉ. अकिनोला परफ्यूम थेट मानेवर किंवा काखेत न लावता शक्यतो कपड्यांवर हलका स्प्रे करण्याचा सल्ला देतात.

फ्रेश वाटण्यासाठीची ही आपली सवय, जर शरीरातील हार्मोन्ससारख्या महत्त्वाच्या यंत्रणांवर परिणाम करत असेल, तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. परफ्यूम-डिओ वापरणं चुकीचं नाही, पण योग्य पद्धतीने आणि मर्यादेत वापर करणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in