Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठी शुभेच्छा; WhatsApp Status वर शेअर करा 'ही' खास ग्रीटिंग्स

प्रजासत्ताक दिनानिमित्त मित्रपरिवार आणि प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवून आपल्या देशाप्रती प्रेम व्यक्त करा. येथे दिलेली शुभेच्छापत्र आपण फ्री डाउनलोड करून आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर करू शकता. आपल्या सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त  द्या मराठी शुभेच्छा; WhatsApp Status वर शेअर करा 'ही' खास ग्रीटिंग्स
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठी शुभेच्छा; WhatsApp Status वर शेअर करा 'ही' खास ग्रीटिंग्स
Published on

प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारत एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनला. हा दिवस फक्त उत्सवाचा नाही, तर देशाच्या स्वातंत्र्याची, एकतेची आणि आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा आहे. या दिवशी मित्रपरिवार आणि प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवून आपल्या देशाप्रती प्रेम व्यक्त करा. सोबतच WhatsApp, Facebook Status आणि आकर्षक HD कार्ड्स शेअर करून या राष्ट्रीय सणाचा उत्साह दुपटीने साजरा करा!

प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी, भारतीय संविधानाचा सन्मान करूया; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

उत्सव तीन रंगांचा, अभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या चरणी, ज्यांनी भारत देश घडवला.; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

भारतीय असल्याचा सार्थ अभिमान बाळगूया; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तिरंगा आमची शान आहे, भारत आमचा अभिमान आहे; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

स्वातंत्र्य ही केवळ भेट नाही, तर ती एक जबाबदारी आहे, ती समर्थपणे पेलूया; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

लोकशाहीचा उत्सव, प्रगत भारताचा संकल्प; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

विविधता असूनही आम्ही एक आहोत, हीच भारताची खरी ओळख आहे; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

नवा भारत, नवी स्वप्ने आणि नवी उमेद! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तिरंगा आमचा श्वास आहे, तिरंगा आमचा ध्यास आहे, भारताच्या प्रगतीचा हाच खरा विश्वास आहे; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आपल्या संविधानाचा आदर करा, देशभक्तीची जाणीव ठेवा; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा; प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

वर दिलेली शुभेच्छापत्र आपण फ्री डाउनलोड करून आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर करू शकता. आपल्या सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

logo
marathi.freepressjournal.in