Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत

प्रेशर कुकरच्या शिट्टीमध्ये आणि व्हेंटमध्ये अन्नाचे कण किंवा घाण अडकते? जाणून घ्या कुकरची शिट्टी, रबर आणि तळ स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स.
Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत
Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

भारतीय स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर अगदी रोज केला जातो. डाळ, भात, वरण किंवा विविध भाज्या शिजवण्यासाठी कुकरचा उपयोग होतो. यामुळे स्वयंपाकाचा वेळ आणि गॅस दोन्हींची बचत होते. मात्र, रोजच्या वापरामुळे कुकरच्या शिट्टीमध्ये आणि झाकणावरील वाफ बाहेर पडण्याच्या छिद्रात अन्नाचे बारीक कण, पाणी आणि घाण अडकू शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास वाफ बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुकर स्वच्छ करताना त्याची शिट्टी आणि व्हेंटची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे, काही सोप्या टिप्स वापरून कुकरची स्वच्छता सहज करता येते. जाणून घेऊया कुकरची शिट्टी आणि इतर भाग स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती...

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत
Curry Leaves Storage Tips : फ्रिजमध्ये कढीपत्ता काळा पडतोय? फक्त 'या' सोप्या ट्रिक्स वापरा; बराच काळ राहील हिरवागार

१. कुकरची शिट्टी आणि व्हेंट कसे स्वच्छ कराल?

कुकरच्या शिट्टीमधून अतिरिक्त वाफ बाहेर पडते. त्यामुळे त्यामध्ये अन्नाचे कण किंवा घाण अडकली असल्यास ती वेळोवेळी स्वच्छ करणं आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम कुकर पूर्णपणे थंड झाल्याची खात्री करा. त्यानंतर झाकणावरील व्हेंटमध्ये अडकलेले अन्नाचे कण टूथपिकच्या मदतीने हलक्या हाताने काढा. व्हेंटच्या आजूबाजूचा भागही व्यवस्थित स्वच्छ करा. मात्र, छिद्र स्वच्छ करताना जोर लावू नका किंवा धातूच्या टोकदार वस्तूंचा वापर करू नका. त्यामुळे व्हेंटचे नुकसान होऊ शकते.

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत
Kitchen Tips : स्वयंपाकघरातील ड्रॉवर राहतील स्वच्छ; अ‍ॅल्युमिनियम फॉइलची ही ट्रिक एकदा वापरून पाहाच

२. कुकर स्वच्छ करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

कुकर दीर्घकाळ चांगला टिकवायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुकर कधीही रिकामा गरम करू नका. स्वयंपाक करताना त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी किंवा इतर द्रवपदार्थ असणं गरजेचं आहे. तसेच खारट पदार्थ कुकरमध्ये रात्रभर ठेवू नका. त्यामुळे स्टीलच्या पृष्ठभागावर परिणाम होऊ शकतो.

कुकरच्या पृष्ठभागावर पाण्यातील खनिजांमुळे पांढरे डाग पडल्यास कोमट लिंबाचा रस किंवा व्हिनेगरच्या मदतीने ते स्वच्छ करता येतात. कुकर घासण्यासाठी स्टील स्क्रबर किंवा धातूच्या जाळीचा वापर टाळा. यामुळे कुकरवर ओरखडे पडू शकतात. तसेच ब्लीच किंवा तीव्र रसायनांचा वापरही करू नका.

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत
Clothing Care Tips : जुने कपडेही दिसतील नव्यासारखे; रंग अन् चमक टिकवण्यासाठी करा 'या' गोष्टी

३. प्रत्येक वापरानंतर कुकर स्वच्छ करा

कुकरचा वापर झाल्यानंतर तो स्वच्छ करणं आवश्यक आहे. यासाठी कोमट पाणी, डिशवॉशिंग लिक्विड आणि साध्या किचन स्पंजचा वापर करा. कुकरचा आतील आणि बाहेरील भाग व्यवस्थित धुऊन घ्या. तरीही तळाला डाग राहिले असतील तर अर्ध्या लिंबाचा रस लावून हलक्या हाताने स्वच्छ करा. गरजेनुसार व्हिनेगरच्या द्रावणाचाही वापर करता येतो. स्वच्छ केल्यानंतर कुकर पूर्णपणे कोरडा करा. यामुळे पाण्याचे डाग पडणार नाहीत.

४. कुकरच्या तळाला अन्न चिकटल्यास काय कराल?

कधी कधी कुकरच्या तळाला अन्न जळतं किंवा घट्ट चिकटून बसतं. अशावेळी लगेच जोरात घासण्याऐवजी कुकरमध्ये पाणी घालून मंद आचेवर १० ते १५ मिनिटं गरम करा. यामुळे चिकटलेले अन्न मऊ होईल आणि ते सहज स्वच्छ करता येईल.

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत
Ironing Tips : आता इस्त्री करणं होईल अगदी सोपं; वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स, कपडे दिसतील नव्यासारखे

दुसरा पर्याय म्हणजे कुकरमध्ये पाणी आणि एक कप व्हाइट व्हिनेगर घालून रात्रभर तसंच ठेवणं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कुकर स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. तरीही डाग राहिल्यास काही दिवसांनी ही प्रक्रिया पुन्हा करता येईल.

५. कुकरच्या रबरचीही घ्या काळजी

कुकरच्या झाकणाला असणारी रबर गॅस्केट म्हणजेच रबरची रिंग हा महत्त्वाचा भाग आहे. स्वयंपाक झाल्यानंतर ही रिंग झाकणातून काढून स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे कोरडी होऊ द्या. रिंगमध्ये अन्नाचे कण किंवा घाण साचणार नाही, याची काळजी घ्या. रिंगची नियमित स्वच्छता केल्यास तिचा वापर चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत होते.

दररोज वापरल्या जाणाऱ्या प्रेशर कुकरची योग्य स्वच्छता आणि देखभाल करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर कुकर स्वच्छ करा आणि त्याची शिट्टी, व्हेंट तसेच रबर रिंगची नियमित तपासणी करा. कुकरच्या मॉडेलनुसार स्वच्छतेच्या सूचना वेगळ्या असू शकतात, त्यामुळे कंपनीने दिलेल्या सूचना आणि मॅन्युअलचं पालन करा.

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत
Stainless Steel Sink Cleaning : सिंकवरील डाग घालवण्यासाठी महागडे क्लिनर नको; किचनमधील 'ही' ट्रिक ठरेल फायदेशीर

टीप : कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आणि आतील दाब पूर्णपणे निघून गेल्याची खात्री केल्यानंतरच शिट्टी, व्हेंट किंवा झाकण स्वच्छ करा. व्हेंटमध्ये टूथपिक किंवा इतर वस्तू खोलवर घालू नका. व्हेंट अडलेला असल्यास कुकर वापरण्यापूर्वी उत्पादकाच्या सूचनांनुसार त्याची तपासणी करा.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)