

वजन कमी करण्यासाठी कधी जिम, कधी डाएट, तर कधी महागडे फिटनेस प्लॅन… पण, तरीही हवं तसं रिझल्ट मिळत नाही असं अनेकांचं होतं. मात्र एक चालण्याची खास पद्धत अशी आहे जी ना महागडी आहे, ना क्लिष्ट - नाव आहे पिरॅमिड वॉक. हे वॉकिंगचं तंत्र कॅलरीज पटकन बर्न करतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि दिवसभरासाठी जबरदस्त ऊर्जा देतं.
कसं आहे हे पिरॅमिड वॉक?
यात चालण्याचा वेग हळूहळू वाढवायचा आणि नंतर तितक्याच टप्प्याटप्प्याने कमी करायचा. वेग वाढवणं म्हणजे शरीराला जास्त ऑक्सिजन लागतो, मेटाबॉलिझम वेगाने काम करतो आणि फॅट बर्निंगचा वेग वाढतो. त्यानंतर वेग कमी केल्याने शरीराला रिलॅक्स मोडमध्ये परत आणता येतं. हा संपूर्ण पॅटर्न पिरॅमिडसारखा दिसतो, म्हणून याला ‘पिरॅमिड वॉक’ म्हणतात.
आरोग्य फायदे – फक्त चालण्यानेही कमाल
चरबी कमी करण्यास मदत
हृदय आणि फुफ्फुसं मजबूत
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकण्यास मदत
स्टॅमिना आणि सहनशक्ती वाढ
तणाव कमी, मूड फ्रेश, झोप सुधारते
कसा कराल ‘पिरॅमिड वॉक’?
५ मिनिटं हलकं वॉर्म-अप
२ मिनिटं - हळू चालणे
३ मिनिटं - मध्यम वेग
४ मिनिटं - जलद चालणे
पुन्हा ३ मिनिटं - मध्यम वेग
शेवटी २ मिनिटं - हळू चालणे
दरम्यान श्वासोच्छवासावर लक्ष ठेवा आणि वॉकच्या आधी-नंतर पाणी प्यायला विसरू नका.
थोडक्यात, फिटनेससाठी रोज जिमला जाणं किंवा महागडे डायट प्लॅन पाळणं गरजेचं नाही. रस्त्यावर, बागेत किंवा घराच्या टेरेसवर कुठेही पिरॅमिड वॉक करून तुम्ही वजन कमी करत, तंदुरुस्त राहू शकता.
( Disclaimer :या सल्ल्यांचा आधार सामान्य माहितीवर आहे. आपल्या शरीराच्या खास परिस्थितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)