फोन स्क्रीनवरील स्क्रॅचेस होतील मिनिटात दूर! पाहा 'या' कमाल ट्रिक्स

सततच्या वापरामुळे फोन स्क्रीनवर स्क्रॅचेस येतात आणि तो फोन जुना व फिका वाटू लागतो. अशावेळी नवीन फोन घेणे प्रत्येकालाच शक्य नसते, म्हणून आम्ही घेऊन आलोय काही सोप्या आणि भन्नाट ट्रिक्स...
फोन स्क्रीनवरील स्क्रॅचेस होतील मिनिटात दूर! पाहा 'या' कमाल ट्रिक्स
Published on

आपला मोबाइल फोन फक्त एक इलेक्ट्रॉनिक उपकरण नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. घरात, ऑफिसमध्ये किंवा बाहेर प्रवासात, प्रत्येक कामासाठी आपण फोनवर अवलंबून असतो – मेसेजेस पाठवणे, कॉल करणे, सोशल मीडिया अपडेट्स तपासणे, अगदी ऑनलाईन खरेदी किंवा बँकिंगसुद्धा, सगळं या छोट्या स्क्रीनवर होते.

फोन खरेदी करताना त्याचे स्टायलिश डिझाइन आणि मुख्य म्हणजे गुळगुळीत स्क्रीन आपल्याला लगेच आकर्षित करते. पण काही काळानंतर सततच्या वापरामुळे स्क्रीनवर स्क्रॅचेस येतात आणि तो फोन जुना व फिका वाटू लागतो. अशावेळी नवीन फोन घेणे प्रत्येकालाच शक्य नसते, म्हणून आम्ही घेऊन आलोय काही सोप्या आणि भन्नाट ट्रिक्स ज्यांचा वापर करून तुम्ही फोनवरील स्क्रॅचेस सहजपणे कमी करू शकता.

टूथपेस्ट:

यासाठी प्रथम तुम्हाला कापसात थोडी टूथपेस्ट घ्यावी लागेल आणि संपूर्ण स्क्रीनवर चांगली लावावी लागेल. स्पीकरला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा/ थोड्या वेळाने, संपूर्ण स्क्रीन कापसाने स्वच्छ करा. यानंतर काही ओरखडे अदृश्य होतील. यामध्ये जेल टूथपेस्ट वापरू नका. त्याऐवजी पांढऱ्या टूथपेस्टचा वापर करू शकता. स्क्रीन प्रोटेक्टर असेल तर हा उपाय खूप प्रभावी ठरेल.

बेकिंग सोडा:

यासाठी कमी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवावी लागेल. स्क्रीनवर कापसाच्या माध्यमातून पेस्ट चांगली लावावी. त्यात पाणी असल्यामुळे जास्त काळजी घ्या. अन्यथा फोन पाण्यामुळे खराब होऊ शकतो. स्क्रीनवर लावल्यानंतर थोडा वेळ तसाच राहू द्या आणि सुकल्यावर कापडाने स्क्रीन पुसून टाका. स्क्रीनवरील अनेक किरकोळ ओरखडे अदृश्य होतील.

फोन स्क्रीनवरील स्क्रॅचेस होतील मिनिटात दूर! पाहा 'या' कमाल ट्रिक्स
किचनमधील हट्टी तेलकट डाग चुटकीसरशी होतील गायब! फॉलो करा या सोप्या टिप्स

कार वॅक्स :

तुमची कार आणि बाईक पॉलिश करण्यासाठी तुम्ही पॉलिश वापरले असेल. स्क्रीनवरील स्क्रॅचेस काढण्यासाठीही पॉलिश खूप उपयुक्त ठरू शकते. स्क्रीनवर थोडे पॉलिश लावून,कापसाने घासून घ्या आणि थोडा वेळ झाल्यानंतर, ते सुकल्यावर स्वच्छ कापसाने स्वच्छ करा. यानंतर फोनची स्क्रीन चमकेल आणि तिथून बरेच स्क्रॅच गायब होतील.

पेन्सिल खोडरबर:

स्क्रॅच काढण्यासाठी पेन्सिल खोडरबरला हलक्या हातांनी स्क्रीनवर हळूवारपणे घासा. थोड्याच वेळात, स्क्रीनवरील किरकोळ स्क्रॅच दिसेनासे होतील. पण, यासाठी दर्जाचे सॉफ्ट इरेजर वापरावे लागेल.

मॅजिक इरेजर:

फोन स्क्रीनवरील स्क्रॅचेस काढण्यासाठी अनेक उपाय असले तरी, त्यापैकी सर्वोत्तम मानले जाते मॅजिक इरेजर. हा मुख्यतः स्क्रीनवरील अस्वच्छता आणि डाग काढण्यासाठी वापरला जातो, पण छोटे स्क्रॅचेस दूर करण्यासही खूप प्रभावी ठरतो. फक्त याचा वापर नेहमी खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, अन्यथा स्क्रीनला हानी पोहोचू शकते.

(टीप: हे उपाय केवळ किरकोळ स्क्रॅचसाठी आहेत आणि ते स्क्रीनला जास्त नुकसान न पोहोचवता स्क्रॅच कमी करण्यासाठी आहेत. जर स्क्रॅच खूप खोल असतील, तर हे उपाय कदाचित काम करणार नाहीत.)

logo
marathi.freepressjournal.in