
फुटाणे किंवा भाजलेले चणे हे अनेक आजारांपासून रक्षण करते कारण हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. आपण अनेक वेळा टाइमपास म्हणून भाजलेले चणे खातो. मात्र, तसे न करता त्यांचा नियमितपणे आहारात समावेश करा. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोह असते. त्यामुळे भाजलेल्या चण्यांचा दररोज आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात.
भाजलेले चणे खाण्याचे असे होतात फायदे
पचनशक्ती सुधारते
भाजलेले चणे दररोज खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी भाजलेल्या चण्यांचा फायदा होतो.
रक्त शुद्ध होते
भाजलेले चणे नियमित खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. तसेच हिमोग्लोबिनची पातळी देखील वाढते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी
भाजलेले चणे खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले असते. कारण यामध्ये ग्लुकोजची मात्रा कमी असते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज आहारात नियमितपणे समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
बद्धकोष्ठतेपासून सुटका
आजच्या फास्टफूडच्या आहारशैलीमुळे अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण झाली आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या व्यक्तिंनी नियमितपणे चण्याचे सेवन करावे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
वजनावर नियंत्रण मिळते
नियमितपणे चमे खाल्ल्याने वजनावर नियंत्रण मिळवता येते. लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करता येते. चण्याचे सेवन केल्याने शरीरातून अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)