'गुलाब खीर'ची सुगंधी मेजवानी; पार्टी अन् गेट-टुगेदरसाठी परफेक्ट डिश

पारंपरिक खिरीला आधुनिक ट्विस्ट देत तयार केलेली ही रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी सुटते. खास करून घरगुती गेट-टुगेदर, बर्थडे पार्टी किंवा सणासुदीच्या मेजवानीत ‘गुलाब खीर’ हा डेझर्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
'गुलाब खीर'ची सुगंधी मेजवानी; पार्टी अन् गेट-टुगेदरसाठी परफेक्ट डिश
Published on

हिवाळ्यात गोड पदार्थांची रेलचेल वाढते आणि त्यातही सुगंधाने भरलेली ‘गुलाब खीर’ ही अनेकांच्या पसंतीची डिश ठरते. पारंपरिक खिरीला आधुनिक ट्विस्ट देत तयार केलेली ही रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी सुटते. खास करून घरगुती गेट-टुगेदर, बर्थडे पार्टी किंवा सणासुदीच्या मेजवानीत ‘गुलाब खीर’ हा डेझर्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

खास काय?

या खिरीची खासियत म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध, केशरचा हलका रंग आणि दूध-तांदळाची गोड संगत. काहीजण यामध्ये ड्रायफ्रूट्स, गुलकंद किंवा रोज सिरपही वापरतात, ज्यामुळे ही खीर अधिक चविष्ट आणि रिच बनते.

बनवायला सोपी, दिसायला आकर्षक

गुलाब खीर तयार करणे अगदी सोपे आहे. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्याने ही डिश सहज बनते. उकळत्या दुधात तांदूळ शिजवून त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि गोडव्यासाठी साखर किंवा कंडेन्स्ड मिल्क घातले की खीर अतिशय छान तयार होते. शेवटी ड्रायफ्रूट्सचा टॉपिंग दिला की डिश आणखी आकर्षक दिसते.

पार्टीसाठी परफेक्ट

या डिशचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे ती आधीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवता येते. त्यामुळे पार्टीच्या दिवशी स्वयंपाकघरात धावाधाव न करता पाहुण्यांना ही डिश थंडगार स्वरूपात सर्व्ह करता येते.

logo
marathi.freepressjournal.in