Ram Navami 2026 : उपवासासाठी खास साबुदाणा खीर; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक डेझर्ट

दूध, साबुदाणा आणि सुगंधी वेलची-केशर यांच्या मिलाफामुळे तयार होणारी ही खीर केवळ चविष्टच नाही, तर ऊर्जा देणारी आणि समाधान देणारीही आहे.
Ram Navami 2026 : उपवासासाठी खास साबुदाणा खीर; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक डेझर्ट
Ram Navami 2026 : उपवासासाठी खास साबुदाणा खीर; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक डेझर्ट(Photo-@cubesnjuliennes)
Published on

रामनवमीच्या पवित्र सणानिमित्त उपवास करणाऱ्यांना काहीतरी गोड, हलकं आणि पचायला सोपं खाण्याची इच्छा असते. अशावेळी पारंपरिक 'साबुदाणा खीर' हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. दूध, साबुदाणा आणि सुगंधी वेलची-केशर यांच्या मिलाफामुळे तयार होणारी ही खीर केवळ चविष्टच नाही, तर ऊर्जा देणारी आणि समाधान देणारीही आहे. गरम किंवा थंड दोन्हीप्रकारे ही खीर तितकीच अप्रतिम लागते.

Ram Navami 2026 : उपवासासाठी खास साबुदाणा खीर; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक डेझर्ट
Chaitra Navratri 2026 : उपवासात हेल्दी राहायचंय? 'हे' सुपरफूड्स खा, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांचा सल्ला

साहित्य :

  • साबुदाणा - अर्धा कप

  • दूध - १ लिटर

  • साखर - अर्धा कप

  • वेलची पावडर - अर्धा टीस्पून

  • काजू (चिरलेले) - ८ ते १०

  • बदाम (चिरलेले) - ८ ते १०

  • मनुका - ८ ते १०

  • केशर काड्या - ५ ते ६

  • तूप - १ टेबलस्पून

Ram Navami 2026 : उपवासासाठी खास साबुदाणा खीर; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक डेझर्ट
SUMMER SPECIAL : बेस्ट रिफ्रेशिंग ड्रिंक! उन्हाळ्यात बनवा मिंट जलजीरा

कृती :

साबुदाणा २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. एका भांड्यात दूध उकळायला ठेवा. दूध उकळल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा घाला आणि मंद आचेवर शिजवा. साबुदाणा पारदर्शक आणि मऊ झाला की त्यात साखर घाला. वेलची पावडर आणि केशर घालून चव वाढवा. कढईत तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुका भाजून खिरीत टाका. खीर घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि गरम किंवा थंड सर्व्ह करा.

Ram Navami 2026 : उपवासासाठी खास साबुदाणा खीर; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक डेझर्ट
घरच्या घरी बनवा गुलाब जामुन खीर; पाहुण्यांना आवडेल खास डेझर्ट, वाचा रेसिपी

टिप्स :

  • साबुदाणा नीट भिजवला नाही तर खीर चिकट होऊ शकते.

  • खीर खूप घट्ट वाटल्यास थोडं गरम दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा.

  • अधिक रिच फ्लेवरसाठी कंडेन्स्ड मिल्कही वापरू शकता.

  • उपवासासाठी साखरेऐवजी गूळ वापरल्यास चव वेगळी आणि हेल्दी होते.

  • सर्व्ह करताना वरून ड्रायफ्रूट्स घातल्यास खीर अधिक आकर्षक दिसते.

logo
marathi.freepressjournal.in