कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कर्करोगाच्या उपचारादरम्यान काही रुग्णांना मळमळ, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, थकवा, वेदना किंवा झोप न लागणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती, चिंता आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. उपचारांचा हा प्रवास काहीसा सोपा व्हावा आणि लवकर बरे व्हावे, या अपेक्षेने काही रुग्ण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी औषधे (OTC), हर्बल उत्पादने, आयुर्वेदिक औषधे, सप्लिमेंट्स किंवा पर्यायी उपचारांचा आधार घेतात. मात्र, कर्करोगाच्या उपचारादरम्यान अशी औषधे किंवा उपचार स्वतःहून सुरू करणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. किरण तामखाने यांनी दिला आहे.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
वारंवार Acidity होतेय? 'ही' लक्षणे असतील तर वेळीच सावध व्हा

दुष्परिणामांमुळे रुग्ण स्वतःहून औषधे घेतात

कर्करोगाच्या उपचारादरम्यान काही रुग्णांना मळमळ, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, थकवा, वेदना किंवा झोप न लागणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. या त्रासातून तात्पुरता आराम मिळावा म्हणून काही जण मेडिकलमधून स्वतःहून औषधे घेतात. मित्र, नातेवाईक किंवा सोशल मीडियावरून मिळालेल्या सल्ल्याच्या आधारेही उपचार सुरू करण्याची शक्यता असते.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
सतत बसून काम केल्याने कंबरदुखीचा त्रास? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

'नैसर्गिक' म्हणजे नेहमी सुरक्षित नाही

हर्बल किंवा नैसर्गिक उत्पादने सुरक्षित असतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र, नैसर्गिक असलेली प्रत्येक गोष्ट निरुपद्रवी असेलच असे नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही हर्बल उत्पादने आणि सप्लिमेंट्स कर्करोगाच्या औषधांशी परस्परसंवाद करू शकतात. त्याचा यकृत, मूत्रपिंड किंवा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो.

कॅन्सर बरा करण्याच्या दाव्यांपासून सावध राहा

एखादी वनस्पती, विशिष्ट आहार, सप्लिमेंट किंवा पर्यायी उपचार कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो किंवा कर्करोग पुन्हा होण्यापासून रोखतो, असे दावे रुग्णांच्या कानावर पडतात. मात्र, अशा दाव्यांकडे अत्यंत सावधपणे पाहणे गरजेचे आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला कर्करोगाचा उपचार थांबवणे किंवा पुढे ढकलणे टाळावे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Throbbing Headache : डोकं ठणकतंय? 'ही' असू शकतात कारणं; जाणून घ्या उपाय

OTC औषधेदेखील ठरू शकतात धोकादायक

मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होणारी औषधे कर्करोगाच्या उपचारादरम्यान प्रत्येक रुग्णासाठी सुरक्षित असतीलच असे नाही. काही वेदनाशामक, आम्लपित्तावरील औषधे, सप्लिमेंट्स किंवा इतर औषधे केमोथेरपी, लक्ष्यित उपचार किंवा इम्युनोथेरपीसोबत परस्परसंवाद करू शकतात.

काही औषधांमुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो किंवा यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही औषध स्वतःहून सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
सतत थकवा अन् विनाकारण वजन कमी होतंय? शरीराच्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

आयुर्वेद, योग किंवा पर्यायी उपचारांचा वापर कसा करावा?

ताण कमी करणे, मन शांत ठेवणे, झोप सुधारणे किंवा जीवनमान सुधारण्यासाठी काही रुग्ण योग, ध्यान, आयुर्वेद किंवा आहारातील विशिष्ट पद्धतींचा आधार घेतात. काही पूरक पद्धती डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित कर्करोगाच्या उपचारांसोबत वापरता येऊ शकतात. मात्र, पूरक उपचार आणि मुख्य कर्करोग उपचाराला पर्याय यामध्ये फरक आहे. वैज्ञानिकदृष्ट्या परिणामकारकता सिद्ध न झालेल्या उपचारांमुळे प्रभावी आणि सिद्ध कर्करोग उपचार थांबवू नयेत.

डॉक्टरांशी प्रत्येक औषधाची माहिती शेअर करा

रुग्णाने घेत असलेले प्रत्येक औषध, सप्लिमेंट, हर्बल उत्पादन किंवा पर्यायी उपचार याची माहिती आपल्या कर्करोगतज्ज्ञांना देणे महत्त्वाचे आहे. कोणतेही नवीन औषध किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकते.

कॅन्सरच्या उपचारादरम्यान स्वतःहून औषधे घेता? 'या' चुका ठरू शकतात धोकादायक; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Cancer Awareness : कर्करोगाचा धोका वेळीच ओळखा; आरोग्य तपासणीत 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या

"कर्करोगाचा उपचार म्हणजे केवळ एखादे औषध घेणे नव्हे. योग्य औषध, योग्य मात्रा आणि योग्य वेळी देण्यासोबतच रुग्ण घेत असलेल्या इतर औषधांची सुरक्षितताही तपासणे आवश्यक आहे," असे वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. किरण तामखाने यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in