September Dry Days 2026 : 'या' ३ दिवशी दारूची दुकानं बंद; सप्टेंबरमध्ये पार्टीचा प्लॅन करण्याआधी तारीख पाहा

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात काही दिवस ड्राय डे असणार आहेत. मुंबई आणि राज्यात नेमक्या कोणत्या तारखांना मद्यविक्रीवर निर्बंध असतील, जाणून घ्या.
September Dry Days 2026 : 'या' ३ दिवशी दारूची दुकानं बंद; सप्टेंबरमध्ये पार्टीचा प्लॅन करण्याआधी तारीख पाहा
Published on

मुंबई : सप्टेंबर महिना म्हणजे सण-उत्सवांची रेलचेल. जन्माष्टमीपासून गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक महत्त्वाचे सण याच महिन्यात येणार आहेत. त्यामुळे पार्टी, डिनर किंवा वीकेंड गेट-टुगेदरचा प्लॅन करत असाल, तर सप्टेंबरच्या कॅलेंडरवर एकदा नजर टाकणं महत्त्वाचं आहे. कारण यंदा सप्टेंबरमध्ये ३ प्रमुख ड्राय डे असणार आहेत.

सप्टेंबरमधील ड्राय डे कोणते?

  • ४ सप्टेंबर, शुक्रवार - जन्माष्टमी

सप्टेंबरमधील पहिला ड्राय डे ४ सप्टेंबरला असणार आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त या दिवशी महाराष्ट्रात मद्यविक्रीवर निर्बंध लागू राहतील.

  • १४ सप्टेंबर, सोमवार - गणेश चतुर्थी

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीही मद्यविक्रीवर निर्बंध असतील.

  • २५ सप्टेंबर, शुक्रवार - अनंत चतुर्थी

सप्टेंबर महिन्यातील आणखी एक महत्त्वाचा ड्राय डे म्हणजे २५ सप्टेंबर. याच दिवशी अनंत चतुर्दशी असून गणेश विसर्जनही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मद्यविक्रीवर निर्बंध लागू राहू शकतात.

ड्राय डेच्या दिवशी काय बंद असतं?

ड्राय डेच्या काळात दारूची दुकानं, वाइन शॉप्स, बार, पब आणि इतर परवानाधारक आस्थापनांमधील मद्यविक्रीवर निर्बंध असतात. मात्र, बंदची नेमकी वेळ आणि अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार बदलू शकते.

पार्टीचा प्लॅन करत असाल तर हे लक्षात ठेवा!

सप्टेंबरमध्ये पार्टी किंवा गेट-टुगेदरचं नियोजन करताना ४, १४ आणि २५ सप्टेंबर या तारखा लक्षात ठेवा. ड्राय डेच्या नियमांमध्ये स्थानिक पातळीवर बदल किंवा अतिरिक्त निर्बंध लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधित तारखेच्या आधी महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग किंवा स्थानिक प्रशासनाच्या ताज्या सूचनांची माहिती घेणं योग्य ठरेल

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in