Ramadan 2026 : इफ्तारसाठी खास गोड पदार्थ! घरीच बनवा शेवयांची स्वादिष्ट बर्फी; वाचा रेसिपी

दुधाची चव, कंडेन्स्ड मिल्कची गोडी आणि ड्रायफ्रूट्समुळे ही बर्फी खूपच स्वादिष्ट लागते. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी इफ्तारसाठी नक्की ट्राय करून पाहा.
Ramadan 2026 : इफ्तारसाठी खास गोड पदार्थ! घरीच बनवा शेवयांची स्वादिष्ट बर्फी; वाचा रेसिपी
(Photo-@Sanjeevkapoor)
Published on

रमजान महिन्यात इफ्तारच्या वेळी गोड पदार्थ खाण्याची खास परंपरा आहे. खीर, शीरखुर्मा किंवा हलवा हे पदार्थ नेहमी बनवले जातात. मात्र यावेळी काहीतरी वेगळं आणि झटपट बनवायचं असेल तर शेवयांची बर्फी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. दुधाची चव, कंडेन्स्ड मिल्कची गोडी आणि ड्रायफ्रूट्समुळे ही बर्फी खूपच स्वादिष्ट लागते. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी इफ्तारसाठी नक्की ट्राय करून पाहा.

Ramadan 2026 : इफ्तारसाठी खास गोड पदार्थ! घरीच बनवा शेवयांची स्वादिष्ट बर्फी; वाचा रेसिपी
Chinese Dosa Recipe : डोसा तर नेहमीच खातो, पण 'चायनीज डोसा' कधी ट्राय केलाय का? घरच्या घरी बनवा हटके रेसिपी

साहित्य :

  • भाजलेल्या शेवया - २५० ग्रॅम

  • दूध - १/२ कप

  • दूध - २ कप

  • कंडेन्स्ड मिल्क - ३/४ कप

  • बदाम काप - सजावटीसाठी

  • पिस्ते काप - सजावटीसाठी

  • तूप - आवश्यकतेनुसार

Ramadan 2026 : इफ्तारसाठी खास गोड पदार्थ! घरीच बनवा शेवयांची स्वादिष्ट बर्फी; वाचा रेसिपी
नॉनव्हेज लव्हर्ससाठी मसालेदार अंडा घोटाळा; घरीच बनवा स्ट्रीट फूड स्टाइल टेस्टी डिश

कृती :

सर्वप्रथम कढईत थोडे तूप गरम करून त्यात शेवया थोड्या तुकडे करून टाका आणि हलक्या हाताने परता. त्यात दूध घालून साधारण ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. आता त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून सतत हलवत रहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. एका ट्रेमध्ये तूप लावून हे मिश्रण ओता आणि वरून एकसमान करा. त्यावर बदाम आणि पिस्त्याचे काप पसरवा. ट्रे फ्रिजमध्ये काही वेळ ठेवा, नंतर मिश्रण सेट झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करा. तयार झालेली शेवया बर्फी सर्व्ह करा.

Ramadan 2026 : इफ्तारसाठी खास गोड पदार्थ! घरीच बनवा शेवयांची स्वादिष्ट बर्फी; वाचा रेसिपी
Sunday Special Recipe : घरीच बनवा मसालेदार स्टफ्ड पापलेट फ्राय; पाहुण्यांसाठी परफेक्ट डिश, वाचा रेसिपी

टिप्स :

  • बर्फी अधिक चविष्ट हवी असेल तर थोडी वेलची पूड घालू शकता.

  • शेवया आधी भाजलेल्या नसतील तर हलक्या आचेवर तुपात चांगल्या भाजून घ्या.

  • बर्फी नीट सेट व्हावी यासाठी मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवणे महत्त्वाचे आहे.

  • ड्रायफ्रूट्समध्ये काजू किंवा अक्रोडही घालू शकता.

logo
marathi.freepressjournal.in